Savitribai Phule Pune University : सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रात परीक्षा अभ्यासी नाट्यप्रयोग शुक्रवारी रात्री सुरू असतांना यावेळी आभाविपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या स्पर्धेत ‘जब वी मेट’ च्या नाटक प्रयोगात रामायणातील पात्र आक्षेपार्ह बोलत असल्याचा आरोप काही विद्यार्थी संघटनांनी करत गोंधळ घातला. या यानंतर या नाटकाचा प्रयोग बंद पाडण्यात आला. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्यात अभाविपचे बाहेरील आणि विद्यापीठातील कार्यकर्ते असल्याचे पुढे आले. दरम्यान, या प्रकारामुळे विद्यापीठात तानावाचे वातावरण होते.
पुणे विद्यापीठात काही दिवसांपासून विद्यार्थी संघटनांमध्ये मोठे वाद होत आहे. यावरून हाणामारीच्या घटना ताज्या असतांना शुक्रवारी देखील मोठा राडा विद्यार्थी संघटनांनी केला. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी रामायणामधील घटनेवर आधारित ‘जब वी मेट’ या नाटकाचा प्रयोगाचे आयोजन केले होते. मात्र या नाटकातील संवादावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला, नाटकातील पात्राच्या तोंडी आक्षेपार्ह मजकूर बोलवल्या गेल्याच आरोप लावत या नाटकाचा प्रयोग उधळून लावण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी देखील केली.
दरम्यान, या ची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हे प्रकरण शांत केले. दरम्यान, या घटनेबाबत अभाविप प्रदेश सहमंत्री शुभंकर बाचल म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तर्फे रामलीला नाटक आयोजित केले होते. या नाटकामध्ये माता सीता आणि प्रभू श्रीराम यांचा अपमान केल्याचे आढळले. याला आम्ही विरोध केल्याने आमच्या कार्यकर्त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच यात सहभागी असणार्याआ सर्व प्राध्यापकांना निलंबीत करण्यात यावे अशी देखील मागणी करतो.
जब वी मेट या नाटकामध्ये प्रभू श्रीराम व सीता माता यांची भूमिका विदूषकाप्रमाणे दाखवण्यात आली. त्याच बरोबर प्रभू श्रीराम यांना राखी सावंत व देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली, त्यामुळे हे नाटक बंद पाडले असल्याचे शुभंकर बाचल म्हणाले.