मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, मॉरिसच्या बॉडीगार्डला अटक

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, मॉरिसच्या बॉडीगार्डला अटक

Feb 09, 2024 08:00 PM IST

Abhishek Ghosalkar Murder case : मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे.माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे.

Abhishek Ghosalkar Murder case
Abhishek Ghosalkar Murder case

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी मॉरिस नोरोन्हाच्या अंगरक्षकाला अटक केली आहे. हल्लेखोर मॉरिसच्या अंगरक्षकाला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत पोलिसांनी अटक केली असल्याचे सांगितले जात आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. अमरेंद्र मिश्रा याला शस्त्रास्त्र कायदा २९ ब आणि ३० अंतर्गत अटक केली आहे. अमरेंद्र मिश्रा मॉरिसचा बॉडीगार्ड म्हणून गेल्या ४ ते ५ महिन्यापासून काम करत होता. बॉडीगार्डला अटक केल्यानंतर आता या घटनेमागील नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे.

अभिषेक घोसळकर यांच्यावर ज्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला. ती अमरेंद्र मिश्राची होती. त्याने ही बंदूक उत्तर प्रदेशातील फुलपूर येथील कारखान्यात बनवली होती. याच बंदुकीतून  मॉरिसने आपल्या कार्यालयात बोलावून घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या. त्याने घोसाळकरवर पाच गोळ्या झाडल्या त्यातील तीन अभिषेक यांना लागल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर दारात उभा राहून काही वेळ त्याच्याकडे पहात उभा राहिला. अभिषेक निपचिप पडल्याचे पाहून त्याने कार्यालयाच्या दारातच स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण पिस्तुलातून गोळी झाडली गेली नाही. यानंतर तो वरच्या मजल्यावर गेला. वर त्याने पिस्तुलमध्ये गोळी लोड करून पुढच्या  काही क्षणातच स्वतःवर गोळी झाडली. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार एकूण ६ राउंड फायर करण्यात आले. 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग