'सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही', अब्दुल सत्तारांनी घेतला निर्णय, कारण काय ?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही', अब्दुल सत्तारांनी घेतला निर्णय, कारण काय ?

'सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही', अब्दुल सत्तारांनी घेतला निर्णय, कारण काय ?

Jan 14, 2025 08:59 AM IST

Abdul Sattar News : शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच त्याचे करण देखील त्यांनी सांगितलं आहे.

'सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही', अब्दुल सत्तारांनी घेतला निर्णय, कारण काय ?
'सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही', अब्दुल सत्तारांनी घेतला निर्णय, कारण काय ?

Abdul Sattar News : शिंदे गटाचे नेते व आमदार अब्दुल सत्तार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचं जाहिर केलं आहे. याचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे. सत्तार म्हणाले, पाच वर्षे काम केली तरी मतदानाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जातीयवाद व धर्मावर निवडणूक येते. हे जे सुरू आहे ते भविष्यासाठी घातक आहे. त्यामुळे कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही. यामुळे सिल्लोड विधानसभेची पुढची निवडणूक लढणार नाही असे सत्तर यांनी जाहीर केले. ही आपली शेवटची निवडणूक असेल असं सत्तार यांनी म्हटलं असून त्यांनी जनतेने त्यांना निवडून दिल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले.

राज्याचे माजी मंत्री व शिवसेना शनडे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे सोमवारी सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे एका कार्यक्रमात गेले असताना त्यांनी तेथे वरील वक्तव्य केलं. सिल्लोडची आगामी नगरपरिषदेची निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक असेल असे सत्तार यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीत जात-पात, धर्म आणला जातो

अब्दुल सत्तार कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना म्हणाले, यावेळी मी थोडक्यात निवडून आलो. सध्या जे काही राजकारण सुरू आहे, ते भविष्यासाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे नगरपरिषदेची निवडणूक ही माझी शेटवची निवडणूक राहील. पुढील विधानसभेची निवडणुकी मी लढवणार नाही. त्यामुळे कुणी काही माझं वाकडं करू शकणार नाही. मी माझ्या मुलांला सांगितलं की तुला लढायचं असेल तर लढ. मी लढणार नाही. 

कारण, मतदारसंघाचा विकास करून देखील शेवटी निवडणूक ही जातीपातीवर होते. आपल्या लोकांना विकास नको तर फक्त जातीवाद हवा. जातीवादामध्ये माणूसकीही सोडून द्यावी लागते. मी पाच वर्षे सातत्याने १८ तास काम केले. पण विधानसभा मतदानाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जातीयवाद, धर्मावर प्रचार सुरू होतो. जात धर्मावर निवडून आलेले लोक हे मरणाऱ्यांना कफनही देणार नाहीत. त्यामुळे ही सवय बदलावी लागणार आहे. नाहीतर राजकारणात कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही असे सत्तार म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर