अजानसाठी अब्दुल कादिर मुकादम यांनी सुचवलेल्या पर्यायाचं गृहमंत्र्यांकडून स्वागत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अजानसाठी अब्दुल कादिर मुकादम यांनी सुचवलेल्या पर्यायाचं गृहमंत्र्यांकडून स्वागत

अजानसाठी अब्दुल कादिर मुकादम यांनी सुचवलेल्या पर्यायाचं गृहमंत्र्यांकडून स्वागत

May 06, 2022 02:57 PM IST

इस्लाम धर्माचे अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांनी अजानसाठी आता एक नवा पर्याय सुचवला आहे. या पर्यायाचं स्वागत होताना पाहायला मिळत आहे.

<p>मशिदींवरचे भोंगे</p>
<p>मशिदींवरचे भोंगे</p> (हिंदुस्तान टाइम्स)

राज ठाकरेंनी गुढी पाडव्याला आधी ते भोंगे खाली उतरवा, ते खाली उतरणार नसतील तर त्या मशिदींसमोर लाऊड स्पीकर लावून मोठ्या आवाजात हनुमान चालिसा म्हणा असं सांगताच राज्यात वातावरण ढवळून निघालं होतं. मशिदींवरचे भोंगे हा विषय गेले काही दिवस चर्चेला येत होता. मशिदींच्या भोंग्यांवरुन दिली जाणारी पहाटेची अजान अनेक ठिकाणी बंद करण्यात आली होती. एकंदरीतच या विषयाचं चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असतानाच मशिदींवरील भोंग्याला पर्याय काय असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. 

इस्लाम धर्माचे अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांनी मात्र एक चांगला पर्याय राज्य सरकारला सुचवला आहे. या पर्यायाला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नसेलं असं अब्दुल कादिर मुकादम यांना वाटत आहे. १९७० सालापासून मशिदींवरील भोंगे सुरु झाले तोवर मशिदींवर भोंगे नव्हते असं अब्दुल कादिर मुकादम यांचं मत आहे. ज्यावेळेस इस्लामचा जन्म झाला, तेव्हापासून कधीच लाऊडस्पीकरवर अजान दिली गेली नव्हती. त्यामुळे आता देखील अशाप्रकारे अजान द्यायची गरज नाही, असं रोखठोक प्रतिपादन मुकादम यांनी व्यक्त करतात. मग सर्वाना सहज उपलब्ध होईल असा पर्याय कोणता असा प्रश्न समोर आला. त्यावेळेस अब्दुल कादिर मुकादम यांनी एक पर्याय राज्य सरकारसमोर ठेवला आहे. हा पर्याय ऐकताच त्या पर्यायाचं स्वागत केलं जाऊ लागलं आहे.

काय आहे तो पर्याय

अब्दुल कादिर मुकादम यांनी अजान आणि भोंगे यावर एक चांगला पर्याय राज्य सरकारकडे ठेवला आहे. तो पर्याय म्हणजे लोकल  रेडिओ स्टेशनचा. लोकल रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून लोकांना अजान आणि नमाज दोन्ही करता येईल आणि त्याचा कोणालाही त्रास होणार नाही असं अब्दुल कादिर मुकादम यांचं म्हणणं आहे.

गृहमंत्र्यांनी केलं स्वागत

दरम्यान अब्दुल कादिर मुकादम यांच्या या पर्यायाचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आहे. हा एक चांगला पर्याय ठरु शकतो मुकादम यांनी सुचवलेल्या पर्यायाचं साव्गत आहे असं गृहमंत्री म्हणालेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर