मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vasai station : महिला डब्यात आढळली बेवारस बॅग! बॉम्बच्या अफवेने वसई स्टेशनवर संपूर्ण ट्रेन केली रिकामी

Vasai station : महिला डब्यात आढळली बेवारस बॅग! बॉम्बच्या अफवेने वसई स्टेशनवर संपूर्ण ट्रेन केली रिकामी

Jan 01, 2024 07:28 AM IST

vasai railway station bomb news : एकीकडे नवीन वर्षाचा जल्लोष साजरा होत असतांना वसई स्थानकावर बॉम्बच्या अफवेने घाबरगुंडी उडाली. येथील स्थानकात संपूर्ण गाडी ही रिकामी करण्यात आली.

vasai railway station bomb news
vasai railway station bomb news

abandoned bag was found in women compartment at vasai railway station: मुंबईत एकीकडे नवीन वर्षाचा जल्लोष साजरा केला जात असतांना वसई स्थानकावर मात्र, एका अफवेने खळबळ उडाली. विरार होऊन चर्चगेटला जाणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात बेवारस बॅग आढळल्याने गोंधळ उडाला. बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पासरल्याने ही संपूर्ण गाडी रिकामी करण्यात आली. यानंतर डॉग आणि बॉम्ब स्कॉडला पाचारण करण्यात आले. त्यांनी बॅगेची तपासणी केल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तब्बल ४५ मिनिटे हा थरार स्थानकावर रंगला.

ट्रेंडिंग न्यूज

Koregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी; मध्यरात्री पासून लागल्या रांगा

या घटनेचे वृत्त असे की, विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक बेवारस बॅग सापडली. या बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरली. यामुळे ही गाडी वसई स्थानकावर थांबवण्यात आली. यावेळी रेल्वे पोलिसांनी तातडीने याची गांभीर्याने दखल घेत संपूर्ण प्रवाशांना बाहेर काढत ही गाडी रिकामी केली. यामुळे प्रवासी देखील गोंधळले.

lpg cylinder price : नव्या वर्षाचे गिफ्ट! तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त झाला LPG सिलिंडर

यानंतर डॉग स्कॉड आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिला डब्यात असलेल्या बेवारस बॅगेची तपासणी केली. मात्र, त्यात काही नव्हते. ही बॅग अशीच बेवारस पणे महिलांच्या डब्यात पडून असल्याने त्यात बॉम्ब असल्याचा संशय बळावला. यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. तब्बल ४५ मिनिटे हा सर्व थरार वसई स्थानकावर सुरू होता. अखेर बॅगेत काही आढळले नसल्यावर वातावरण निवळले. ही बॅग एका प्रवाशाची होती जी तो चुकून सोडून गेला होता.

दरम्यान, मोठ्या संख्येने रेल्वे पोलिस, जीआरपी जवान वसई स्थानकात दाखल झाले. अग्निशमन दलालाही सज्ज ठेवण्यात आले होते. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. सुरवातीला रेल्वेच्या सामानाच्या डब्यात बॉम्ब असल्याची अफवा होती. मात्र, ट्यात काही आढळले नाही. यानंतर लेडीज बोगीची तपासणी करण्यात आली. त्यात ही बेवारस बॅग आढळली.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग