Journalist Pankaj Khelkar passed away : 'आज तक' व 'इंडिया टुडे' वृत्तवाहिनीचे पुण्यातील माजी प्रतिनिधी आणि वरिष्ठ पत्रकार पंकज खेळकर (वय ५२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. पाषाण येथील सिंध सोसायटीत त्यांचे वास्तव्य होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. खेळकर हे मूळचे अकोला येथील असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते पुण्यात 'आज तक' या वृत्तवाहिनीशी संबंधित होते.
पंकज खेळकर हे पत्रकारितेत गेल्या २० ते २२ वर्षांपासून कार्यकरत होते. ते गेल्या १८ वर्षांपासून आजतकमध्ये कार्यरत होते त्यांनी नुकताच राजीनामा देऊन पुण्यातील एमआयटीमध्ये रुजू झाले होते. त्यांनी इंडिया टूडे ग्रुपमध्ये असोसिएट एडिटर ही जबाबदारी सांभाळली आहे. ते पुणे ब्युरो म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे.
याशिवाय आज तक पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातिल विविध विषयांवर त्यांनी वृतांकन केले आहे. खेळकर हे १९९२ पासून चित्रपट निर्मिती आणि माहितीपट आणि लघुपट निर्मितीचाही अनुभव आहे. आजतकसाठी पंकज खेळकर यांनी सामाजिक, राजकीय, क्रीडा, पर्यावरण, गुन्हेगारी अशा विविध विषयांवर वृतांकन केले आहे. तेलगी घोटाळा, जर्मन बेकरी ब्लास्ट रिपोर्टिंग, लोकपाल कायद्यासाठी अण्णा हजारे आंदोलन तसेच कोरोना काळात त्यांनी अनेक समस्यांवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी सिम्बायोसिस, पुणे येथून पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते. त्यांनी लेखन, डिजिटल व्हिडीओग्राफी, व्हिडीओ एडिटिंग या सारख्या अनेक विषयात रस होता.