मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aaditya Thackeray: महाराष्ट्रात गँगवॉर सुरू, एकनाथ शिंदे गँगचे लीडर; आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Aaditya Thackeray: महाराष्ट्रात गँगवॉर सुरू, एकनाथ शिंदे गँगचे लीडर; आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 04, 2024 05:43 PM IST

Aaditya Thackeray Slams Maharashtra Government: उद्धव ठाकरे गटातील आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

aaditya Thackeray, Eknath Shinde
aaditya Thackeray, Eknath Shinde

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईतील रेसकोर्स प्रकल्प आणि राज्यातील कायदा व सुरव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "दिघा रेल्वे स्थानक, अटल सेतू प्रकल्प उभारून पूर्ण झाले होते. परंतु, उद्घाटनासाठी सरकारला मुहूर्त नव्हता. कोस्टल रोडचे काम पूर्ण झाले नाही. मात्र, केवळ निडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटनाचा घाट घातला जातोय. कोस्टल रोडचे काम आमचे आहे. उध्दव ठाकरे यांचे ते स्वप्न होते. दर महिन्याला तिथे भेट द्यायचो. आमचे सरकार असते तर सगळी कामे व्यवस्थित झाली असती", अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्र्यांचे बिल्डरसोबत साटेलोट सुरू होते. तबेले बांधले जाणार आहेत. पण घोडे हे सुटा बुटतील लोकांचे आहेत. ज्यांना तबेले बांधून दिले जाणार आहेत. पण जनतेचा पैसा त् साठी का वापरला जातोय? लाच देणे सुरू होते. आत्ता सेंट्रल पार्क चा घाट घातला जातोय. कोणत्या बिल्डरसाठी हे सुरू आहे? सेलिब्रिटींना ट्विट करायला लावले. पण प्रकल्प उभारताना बाजूच्या कोणत्या एसआरएमध्ये अजू बाजूच्या लोकांना सामावून घेणार? पण मोफत एफएसआय मुंबईकरांच्या पैशातून बिल्डरला देणार आहात. म्हणूनच मोठ्या प्रमाणात या पार्कला विरोध होतोय, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, "आम्ही प्रश्न घेतल्यानंतर क्लब हाऊस कॅन्सल झाले. पण आम्ही बिल्डरांना तिथे कार पार्क प्रकल्प करू देणार नाही. आम्ही मुंबईकरांचा पैसा वाया जाऊ देणार नाही. कारण रेस कोर्सचा वापर हा सामान्य मुंबईकर योगा, मॉर्निंगवॉकसाठी करतो. येथे १०० कोटी रुपये खर्च करून तबेले बांधून दिले जाणार आहेत. पण आयआरडब्लूआयटीसी हे स्वतः देखील ते करू शकत होते, सेंट्रल पार्क होणार त्याबद्दल मुख्यमंत्री आणि प्रशासक खोटा बोलत आहेत. आयआरडब्लूआयटीसीला मुलुंड येथील जागा घ्यायला लावणार होते. वेलिंग्टन क्लब आणि इतरही क्लबची लिझ संपलेली आहे. आम्ही तिथे लॅण्डस्केप मैदान करायला सांगणार होतो. पण प्रशासक सतत त्यांची भूमिका बदलत आहेत. लोकांचा विरोध आहे, याची आठवण सरकार आणि प्रशासकाना आदित्य ठाकरे यांनी करून दिली.

Ajit Pawar in Baramati : अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद! म्हणाले,'मी आजपर्यंत...'

"कॅबिनेट मीटिंग मध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली आहे का ? सरकारमधील आमदार गणपती मिरवणुकीत पिस्तूल काढतात. पोलीस ठाण्यात गोळीबार करतात आणि अशा आमदारांना सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष केले जाते. एवढेच नव्हेतर यांचे अधिकारी महिलेवर गाडी चालवतात, आमदरचा मुलगा अपहरण करतो हे सगळे कॅमेरा मध्ये कैद झाले आहे. यांच्यावर यूएपीए कायद्याने कारवाई झाली पाहिजे होती. आता भाजपने त्यांची अधिकृत भूमिका या प्रकरणांमध्ये सांगावी, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपला चॅलेंज दिले आहे.

WhatsApp channel