मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दाव्होसमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी? दौऱ्याचा तपशील जाहीर करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी
Aaditya Thackeray On Eknath Shinde
Aaditya Thackeray On Eknath Shinde

दाव्होसमध्ये कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी? दौऱ्याचा तपशील जाहीर करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी

25 January 2023, 9:10 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Aaditya Thackeray On CM Eknath Shinde's Davos tour: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्होस दौऱ्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधत या दौऱ्याचा तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे.

CM Eknath Shinde's Davos tour: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच आपल्या शिष्टमंडळासह डाव्होस दौऱ्यावर गेले होते. चार दिवसांच्या या डाव्होस दौऱ्यात साधारणत: ३५ ते ४० कोटी रुपये अंदाजित खर्च झाले. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी नेमके काय केले? याचा तपशील जाहीर करण्याची मागणी शिवसेना नेते माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

ट्रेंडिंग न्यूज

शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी दाव्होस दौऱ्यावरून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत म्हणाले, "डाव्होस दौऱ्यातून महाराष्ट्रात दीड लाख कोटींची गुंतवणूक आली, असा दावा सरकारकडून जात आहे. डाव्होसमध्ये महाराष्ट्र सरकारचा जो अधिकृत कार्यक्रम होता, हा कार्यक्रम १६ ते २० जानेवारी असा ठरवला होता. या कार्यक्रमासाठी अंदाजित ३५ ते ४० कोटी खर्च झाल्याची माहिती मिळाली.यामध्ये आणखी नवीन खर्च वाढू शकतो. तिकडे मुख्यमंत्र्यांचा मित्रपरिवारही गेला होता. ते कुठे राहिले? त्यांचा खर्च कोणी केला? ज्या महागड्या वाहनांतून फिरले, त्याचा खर्च कोणी केला? याची संपूर्ण माहिती महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवे, असं बोलत अदित्या ठाकरेंनी दाव्होस दौऱ्याचा तपशील जाहीर करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वीही ठाकरे गटातील अनके नेत्यांनी दाव्होस दौऱ्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. दाव्होस दौऱ्यातील गुंतवणूकीमुळे महाराष्ट्रातील तरूणांना रोजगार मिळेल, ही चांगली गोष्ट आहे. पण ज्यावेळी महाराष्ट्रातील मोठ्या कंपन्या आणि उद्योगधंदे गुजरातला पळवली गेली, तेव्हा मुख्यमंत्री कुठे गेले होते? असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे गटाला टोला लगावला होता.