मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 25, 2022 08:56 PM IST

महाराष्ट्रात येणारा मेडिसीन डिव्हाइस पार्क (Medical device park) प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची कल्पना सत्ताधारी पक्षाला आहे का?असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला ट्विट करून विचारत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर
आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

Medical device park : १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा व एक लाख रोजगार निर्मिती क्षमता असताना वंदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर्स प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकाकरण तापलं आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिवसेना युवात नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं होतं. यानंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात येणारा मेडिसीन डिव्हाइस पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची कल्पना सत्ताधारी पक्षाला आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला ट्विट करून विचारत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरेंनी शिवसेना नेत्या प्रियंका चर्तुवेदी यांचे ट्विट शेअर करत म्हटले आहे की, वेदांता-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिव्हाइस पार्क योजनेलाही मुकावं लागलं आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर -

यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले “माझा त्यांना प्रश्न आहे की, ‘मेडिसीन डिवाइस पार्क’ हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता याचा एक चिठ्ठीचा तरी ते पुरावा दाखवू शकतात का?उगाच काहीपण मनात येईल ते बोलायचं,ते अडीच वर्ष सत्तेत होते. मात्र अडीच वर्षांत काहीच केलं नाही. केवळ केंद्र सरकारला शिव्या देण्याचं काम केलं आणि आता मनात येईल ते बोलत आहेत. माझा त्यांना एक सवाल आहे,किमान एक चिठ्ठी तरी दाखवा की ‘मेडिसीन डिवाइस पार्क’ महाराष्ट्रासाठी मंजूर झाला होता आणि मग तो दुसरीकडे गेला. रोज खोटं बोलायचं,रेटून बोलायचं याने महाराष्ट्र कधीच पुढे जाणार नाही. आम्ही हिंमतीने महाराष्ट्रात गुंतवणूक आणली,यापुढेही आणून दाखवू, असे फडणवीस म्हणाले.

WhatsApp channel