Aaditya Thackeray property : जवळपास सर्वच प्रमुख पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर करण्यात आल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज तिसरा दिवस होता. आज गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्तमहायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांनी आज आपला अर्ज दाखल केला. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनाही अर्ज दाखल केले आहेत.शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मोठं शक्तिप्रदर्शन करत वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. तसेच त्यांच्यावर दाखल गुन्ह्याबाबतही माहिती देण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांनी अर्ज दाखल करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आई रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत व तमाम वरळीकरांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून १८२-वरळी विधानसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला.यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून आदित्य ठाकरेंची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांची एकूण संपत्ती २१ कोटी ४८ लाख रुपये असून त्यांची गुंतवणूक मोठी आहे. तसेच, रायगडमध्ये जमीन आणि मुंबईत दोन दुकान गाळे, अलिशान कार व कोट्यवधींचे दागिने आहेत. तसेच एक गुन्हाही त्यांच्या नावावर नोंद आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड येथे काही एकर जागा आहे. ज्याचं सध्याचं बाजार मूल्य १ कोटी ४८ लाख ५१ हजार ३५० रुपये आहे. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दोन दुकानाचे गाळे आहेत. ज्याचं आताचं बाजार मूल्य ४ कोटी ५६ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे BMW कार तसेच १ कोटी ९१ लाख ७ हजार १५९ रुपयांचे दागिने आहेत.
जंगम मालमत्ता १५ कोटी ४३ लाख ३हजार ६० तर स्थावर मालमत्ता ६ कोटी ४ लाख ५१ हजार ३५० रुपये आहे. बँक खात्यात २ कोटी ४४ लाख १८ हजार ९८५ रुपये. बँक खात्यात फिक्स डिपॉसिट २ कोटी ८१ लाख २० हजार ७२३ रुपये आहे.
आदित्य ठाकरेंच्या नावावर शेअर मार्केटमधील गुंतवणूक ७० हजार, म्युच्युअल फंड १० कोटी १३ लाख ७८ हजार ५२ रुपये आहे. एलआयसी पॉलिसी २१ लाख ५५ हजार ७४१ रुपये आहे.
संबंधित बातम्या