राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महायुती व महाविकास आघाडीचे नेते राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे प्रचारसभा घेत असतानाच युवानेते आदित्य ठाकरेही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आदित्य ठाकरेंकडून महायुतीवर हल्ले चढवले जात आहेत. आदित्य ठाकरेंनी देवाच्याआळंदीत केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान हल्ला चढवला.
विधानसभा निवडणुकांची प्रचार आता रंगात आला असतानाच सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांसह युवा नेते आणि तरुण आमदारही पक्षासाठी राज्य दौरे करत आहेत. शिवसेना ठाकरेंचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची आज खेड विधानसभा मतदारसंघात सभा झाली. खेडमधील देवाच्या आळंदीत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुतीवर जोरदार घणाघात केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांना आम्हाला राजकारणातून संपवायचं आहे, अगदी उद्या हे ठाकरे आडनाव लावूनही फिरतील. एकवेळ असा विचार करा,आम्ही राजकारणातून बाहेर झालो. पण,एकतरी उद्योग राज्यात आणून दाखवायचा ना?असा सवाल करतराज्यात येणारे उद्योग गुजरातला पाठवल्यावरून महायुती व मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, बडोद्यामध्ये नेमका रोड शो कशासाठी काढला, नरेंद्र मोदी याचे उत्तर देतील का? तिथं कोणती ही निवडणूक नाही. बडोद्यातील रोड शो महाराष्ट्राला डीवचण्यासाठीच काढला. महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून, तरुणांचे रोजगार पळवून एअर बस प्रकल्प गुजरातला नेल्याच्या आनंदात मोदींनी रोज शो केला, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला महायुतीने पक्षात घेतलं. बदलापूर घटनेचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला तुझ्यावर बलात्कार झाला का?असा प्रश्न विचारणाऱ्यांना तुम्ही तुमचे लाडके भाऊ समजणार का? दीड हजार रुपयांसाठी तुम्ही त्यांना मत देणार का?, असा सवालही आदित्य यांनी उपस्थित महिलांना विचारला. आदित्य म्हणाले की,भाजप मोठी जादूगार आहे. २०१४ मध्येआश्वासन दिलेले १५ लाखांचे २०२४ मध्ये १५०० झाले. २०१४ मध्ये हीच भाजपा १५ लाख रुपये देणार होती. भाजप खूप मोठी जादूगार आहे. आता डोळे मिटा आणि उघडा.आता याबाबत तुम्हीच विचार करा.
आदित्यठाकरेयांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना म्हटले की, शेती कशी करावी, मुख्यमंत्र्यांकडून शिका. ते थेट हेलिकॉप्टर मधून शेतात पोहोचतात. शेतकऱ्यांनो सांगा,तुम्ही किती वर्षांपासून शेती करताय. पण तुम्ही कधी हेलिकॉप्टरमधून शेतात गेलात का? नाही, मग तुम्ही कसली शेती करताय. तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून शिका, ते बघा नेहमी हेलिकॉप्टरमधून थेट शेतात जातात, शी टीका ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली.