मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे स्टेशनवर आता नवीन आधार कार्ड मिळवा, अपडेट करा
Aadhaar Counters at Pune railway station
Aadhaar Counters at Pune railway station

पुणे स्टेशनवर आता नवीन आधार कार्ड मिळवा, अपडेट करा

17 August 2022, 19:54 ISTHT Marathi Desk

मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर आता प्रवाशांना आपला आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. १५ ऑगस्ट पासून पुणे रेल्वे स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर आता प्रवाशांना आपला आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. १५ ऑगस्ट पासून पुणे रेल्वे स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. डिजिटल इंडिया चळवळीत एक नवीन पाऊल टाकत पुणे रेल्वे स्टेशनवर आधार काउंटर उघडण्यात आले आहे. युआयडिएआय (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) च्या समन्वयाने येथे नवीन आधार कार्ड दिले जातील. शिवाय आधार कार्डमधील माहिती अपडेट केली जाईल. यासाठी रेल्वे विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना आधार अपडेट करण्याविषयी विशेष प्रशिक्षण दिले आहे. हे कर्मचारी काउंटर चालवणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

नवीन आधार नोंदणी आणि अनिवार्य आधार अपडेट मुलांसाठी बायोमॅट्रिक इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध असतील आणि इतर पर्यायी अपडेट जसे की मोबाइल नंबर अपडेट, पत्ता बदलण्यासाठीच्या अपडेटसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

पुणे स्टेशनवर ही सुविधा १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. यानंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच नागपूर रेल्वे स्टेशनवर आधार अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याते रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.