Pune Crime: संतापजनक ! पुण्यात तरुणीला विवस्त्र करुन मारहाण; विवस्त्रावस्थेतील ध्वनिचित्रफीत व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime: संतापजनक ! पुण्यात तरुणीला विवस्त्र करुन मारहाण; विवस्त्रावस्थेतील ध्वनिचित्रफीत व्हायरल

Pune Crime: संतापजनक ! पुण्यात तरुणीला विवस्त्र करुन मारहाण; विवस्त्रावस्थेतील ध्वनिचित्रफीत व्हायरल

Updated Feb 02, 2023 11:33 AM IST

Pune Crime : पुण्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. तरुणीला पळवून नेल्याच्या रागातून तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून तिला विवस्त्र करत मारहाण करण्यात आली.

<p><strong>Maharashtra Crime News</strong></p>
<p><strong>Maharashtra Crime News</strong></p> (HT_PRINT)

पुणे : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. प्रेमप्रकरणातून तरुणीला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या बहिणीचे अपहरण करून तिला विवस्त्र करत मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर या घटनेचा व्हिडिओ काढत तो व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या बहिणीने तक्रार दिली आहे. ही घटना लोणीकाळभोर येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या प्रकरणी नंदकुमार माटे, सुंदराबाई माटे, आरती पिंपळे, बाळासाहेब पिंपळे, सागर जगताप, श्रीराम गोसावी (सर्व रा. उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीच्या बहिणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

तक्रारदार महिला आणि आरोपी हे नातेवाईक आहेत. आरोपी नंदकुमार माटे यांच्या नात्यातील एका मुलीला फिर्यादीच्या भावाने पळवून नेले. दरम्यान या घटनेचा राग मोटे कुटुंबीयांना होता. त्यांनी तक्रारदार महिला आणि तिच्या बहिणीचे अपहरण केले. त्यांना एका खोलीत डांबून ठेवत विवस्त्र करत मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर त्याच्या व्हिडिओ देखील त्यांनी काढला. मात्र, त्यांनी पत्ता सांगितला नाही. यामुळे त्यांना पुन्हा बेदम मारहाण करण्यास आरोपींनी सुरवात केली. तब्बल दोन दिवस हा प्रकार सुरू होता.

मोबाइलमध्ये काढलेले व्हिडिओ आरोपींनी व्हायरल केले. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काळे करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर