मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Wagholi news : खळबळजनक! पुण्यात वाघोली पोलिस पोलीस चौकी समोर तरुणाने स्वतःला घेतले पेटवून; प्रकृती गंभीर

Pune Wagholi news : खळबळजनक! पुण्यात वाघोली पोलिस पोलीस चौकी समोर तरुणाने स्वतःला घेतले पेटवून; प्रकृती गंभीर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 13, 2024 01:51 PM IST

Pune Wagholi news : पुण्यात वाघोली पोलिस ठाण्यासमोर एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात तरुण तब्बल ९० टक्के भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Pune Wagholi police station news
Pune Wagholi police station news

Pune Wagholi police station news : पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर आज सकाळी ११ च्या सुमारास एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एक तरुण ११ वाजता सकाळी पोलीस चौकी समोर आला. त्याने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून न स्वतःला पेटवून घेतले. यात तरुण ९० टक्के भाजला असून गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याची परिस्थिती चितांजनक आहे.

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा १६वा हप्ता कधी मिळणार? पाहा लाभार्थ्यांची यादी

रोहिदास अशोक जाधव (वय २८, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. यामध्ये तरुण ९० टक्के भाजला आहे. त्याला बाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Surya Rashi Parivartan : आज सूर्याचा कुंभ राशीत प्रवेश! दान-धर्मासोबत करा या खास गोष्टी, लाभ होईल

मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाला मारहाण झाली होती. या प्रकरणी पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नसल्याने रोहिदासने आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलीस चौकी समोर येत स्वत:ला पेटून घेतले. यामध्ये तो ९० टक्के भाजला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. बुधवार काल बुधवार पेठेत एका महिलेचा चोरीच्या संशयातून खून करण्यात आला होता. तर एका व्यक्तीवर देखील वस्तऱ्याने वार करण्यात आले होते. तर एका मित्राने आपल्या मित्रावर गोळीबार केला होता. पुण्यात नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे सांगितले होते. मात्र, शहरातील गुन्हेगारी ही वाढतच चालली आहे.

WhatsApp channel