जेवताना ताटात हात घातल्याने केला तरुणाचा खून! पुण्यातील धायरीतील घटना; पाचजणांविरुद्ध गुन्हा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जेवताना ताटात हात घातल्याने केला तरुणाचा खून! पुण्यातील धायरीतील घटना; पाचजणांविरुद्ध गुन्हा

जेवताना ताटात हात घातल्याने केला तरुणाचा खून! पुण्यातील धायरीतील घटना; पाचजणांविरुद्ध गुन्हा

Updated Oct 14, 2024 09:50 AM IST

Pune Dhayri Murder : पुण्यात धायरी येथे दारू प्यायल्यावर एकाने ताटात हात घातल्यामुळे त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे.

जेवतांना ताटात हात घातल्याने केला तरुणाचा खून! पुण्यातील धायरीतील घटना; पाचजणांविरुद्ध गुन्हा
जेवतांना ताटात हात घातल्याने केला तरुणाचा खून! पुण्यातील धायरीतील घटना; पाचजणांविरुद्ध गुन्हा

Pune Dhayri Murder : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. किरकोळ कारणावरून एकमेकांची हत्या करण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. धायरी येथे दारु प्याल्यानंतर एकाने ताटात हात घातल्याने झालेल्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री धायरी रस्त्यावरील त्रिमुर्ती किराणा दुकानासमोर मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी तरुणाला बांबू, दगडाने मारहाण करून त्यांची हत्या केली. या प्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य घोरपडे (वय २१, रा. घोरपडे चाळ, गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकाश ऊर्फ नन्या परदेशी, त्याचा सावत्र भाऊ सुरेश शुक्ला तसेच आणखी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आदित्यची आई राजश्री संतोष घोरपडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचे वृत्त असे की, आदित्य घोरपडे व त्याचे मित्र नऱ्हे येथील गॅलक्सी रेस्टो बार येथे दारु प्यायला बसले होते. दारु प्याल्यानंतर त्यांनी जेवण मागविले. दरम्यान, जेवण करतांना आकाशने आदित्यच्या ताटात हात घालून खण्यास सुरुवात केली. यामुळे भडकलेल्या आदित्यने माझ्या ताटातील कशाला खातो असे आकाशला म्हटले. यावेळी दोघेही दारूच्या नशेत होते. यातून त्यांच्यात मोठा वाद झाला. काही वेळाने दोघेही तेथून निघून गेले. मात्र, धायरी रस्त्यावरील त्रिमूर्ती किराणा माल दुकानासमोर मध्यरात्री १ सुमारास आकाश व त्याच्या काही मित्रांनी आदित्यला रस्त्यात अडवून मारहाण केली. त्याला काठीने बांबूने मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात दगड मारला. या घटनेत आदित्य हा गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांची घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, अमोल झेंडे, निखिल पिंगळे, सहायक आयुक्त अजय परमार, साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, गुन्हे निरीक्षक अतुल भोस हे घटनास्थळी आले. त्यांनी आरोपींना अटक करण्यासाठी पथकाची स्थापना केली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक भोस यांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर