जेवण बनविले नाही म्हणून महिलेचा खून! सातारा जिल्ह्यातील कराड येथील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जेवण बनविले नाही म्हणून महिलेचा खून! सातारा जिल्ह्यातील कराड येथील धक्कादायक घटना

जेवण बनविले नाही म्हणून महिलेचा खून! सातारा जिल्ह्यातील कराड येथील धक्कादायक घटना

Nov 06, 2024 10:38 AM IST

karad Crime News : सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जेवण तयार केले नाही म्हणून एकाने एका महिलेची हत्या केली.

जेवण बनविले नाही म्हणून महिलेचा खून! सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील धक्कादायक घटना
जेवण बनविले नाही म्हणून महिलेचा खून! सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील धक्कादायक घटना

karad Crime News : जेवण तयार केले नाही या कारणावरून एकाने महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कऱ्हाड येथील रेठरे खुर्द, (ता. कन्हाड) येथील वाठार ते रेठरे जाणाऱ्या मार्गालगत मोहिते मळा नावच्या शिवारात शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सिंधू जाधव (वय ६५, रा. डोंगरसुनी-सावळज, ता. तासगाव, जि. सांगली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर विठ्ठल ज्ञानदेव चौगुले (वय ५२, रा. शिरशी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे खुर्द येथील जगन्नाथ बापू मोहिते यांचे जनावरांचे शेड वाठार ते रेठरे जाणाऱ्या मार्गालगतच्या मोहिते मळा नावच्या शिवारात आहे. काही शेतकरी त्यांच्या शिवारात गेले होते. यावेळी त्यांना जगन्नाथ मोहिते यांच्या शेडनजीक सिंधू जाधव यांचा नग्नावस्थेतील मृतदेह दिसला. या घटनेची माहिती त्यांनी तातडीने कन्हाड ग्रामीण पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची व मृतदेहाची पाहणी केली असता सिंधू जाधव यांचा अंगावर मारहाणीच्या मोठ्या खुणा पोलिसांना आढळल्या.

सिंधु जाधव व विठ्ठल चौगुले हे जगन्नाथ मोहिते यांच्या शेडजवळ एका झोपडीत राहत होते. सिंधू जाधव ही महिला ऊसतोड मजूर असून दोघेही एकत्र झोपडीत राहत होते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी विठ्ठल चौगुले याला मध्यरात्री अटक केली. त्याची चौकशी केली असता त्यानेच सिंधु यांचा खून केला असल्याचं उघडं झालं. सिंधु यांनी जेवण तयार केले नाही. यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादातून विठ्ठल चौगुळे यांनी सिंधू जाधव हिला लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण केली. त्यांना झोपडीतून बाहेर काढून त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या नंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक तपासात डोक्याला गंभीर मार लागल्याने सिंधू जाधव हिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर