मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले! ईव्हीएमचं बटन दाबलं अन् क्षणात मृत्यू झाला; साताऱ्यातील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले! ईव्हीएमचं बटन दाबलं अन् क्षणात मृत्यू झाला; साताऱ्यातील धक्कादायक घटना

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले! ईव्हीएमचं बटन दाबलं अन् क्षणात मृत्यू झाला; साताऱ्यातील धक्कादायक घटना

Nov 20, 2024 11:46 PM IST

Satara Assembly Election 2024 : सातारा येथे धक्कादायक घटना घडली आहे. मतदान करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा मतदान केल्यावर काही वेळातच मृत्यू झाला आहे.

मतदानचा हक्क बाजवण्यासाठी गेले! ईव्हीएमचं बटन दाबलं अन् क्षणात मृत्यू झाला; साताऱ्यातील धक्कादायक घटना
मतदानचा हक्क बाजवण्यासाठी गेले! ईव्हीएमचं बटन दाबलं अन् क्षणात मृत्यू झाला; साताऱ्यातील धक्कादायक घटना (freepik)

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडले. मतदानादरम्यान अनेक घटना आज घडल्या. साताऱ्यात देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. एक व्यक्ति मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आली. या व्यक्तिने मतदानाचा हक्क बजावला. मात्र, काही वेळातच  हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकी घटना ?

श्याम धायगुडे (वय ६७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्याम धायगुडे हे साताऱ्यातील खंडाळा तालुक्यात मोरवे येथे राहतात. या ठिकाणी मतदानाच हक्क बजावण्यासाठी ते गेले होते. मतदान केंद्रांवर प्राथमिक प्रक्रिया पार पाडल्यावर त्यांनी ईव्हीएमचे बटन दाबत मतदानाचा हक्क बजावला. त्यांना अचानक छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागला. त्यांना काही वेळातच हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांना खाजगी वाहनाने लोणंद येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. डॉक्टरांनी मृत व्यक्तीच्या मृतदेहाचे शव विच्छेदन केले. यानंतर त्यांचा मृतदेह हा त्यांच्या कुटुंबीयाना देण्यात आला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हलहळ व्यक्त केली.

परभणी जिल्ह्यातही एकाचा मृत्यू

परभणी जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. येथील जिंतूरच्या निवळी बुद्रुक येथील मतदान केंद्रावर एकाला ह्दयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.या व्यक्तीला बोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. लिंबाजी खिस्ते असं मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

Whats_app_banner