Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा २ तासांचा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा २ तासांचा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा २ तासांचा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद

Published Jan 24, 2024 05:59 AM IST

Mumbai Pune express way: पुणे : मुंबई- पुणे एक्स्पप्रेसवे वर आज बुधवारी पुन्हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळा पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद ठेवली जाणार आहे.

Mumbai Pune express way
Mumbai Pune express way

Mumbai Pune express way block today: मुंबई पुणे एक्सप्रेसवे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही एक्सप्रेस वे ने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवार नंतर आज बुधवारी (दि २४) देखील दोन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी १२ ते २ दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळने (एमएसआरडीसी) दिली आहे.

Uddhav Thackeray : भाजप भेकड व भाकड पक्ष.. तेथे भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना नाही; ठाकरेंचा वार

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी २४.२५०. येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हे काम आज बुधवारी (दि २४) दुपारी १२ ते २ या वेळेत केले जाणार आहे. या कालावधीत पुण्याकडे जाणारी सर्व सर्व प्रकारची वाहने (हलकी तसेच जड-अवजड वाहने) ही बंद ठेवण्यात येणार आहे.

येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने शेडुंग फाटा कि.मी ८.२०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातुन मॅजिक पॉईंट कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

Bharat Ratna : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत रत्न, मोदी सरकारची मोठी घोषणा

गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर दररोज लाखोंच्या संख्येने वाहनं ये-जा करत असतात. परंतु गेली काही दिवसांपासूंन या मार्गावर सातत्याने या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जात आहे. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप होत आहे. या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर