Pune News : लिंगाणा किल्यावरून ४०० फूट खोल दरीत कोसळून मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू
Pune News : पुण्यातील लिंगाणा किल्ला सर करण्यासाठी मुंबईहून आलेल्या एका पर्यटकाचा सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याने मृत्यू झाला.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणार लिंगाणा किल्ला हा पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. हा सुळका सर करण्यासाठी देशातून पर्यटक आणि गिर्यारोहक या ठिकाणी येत असतात. असाच एक ट्रेकर्सचा ग्रुप मुंबईहून आला असताना या ग्रुपमधील एक परीतकाचा खोल दरीत पडून मृत्यू झाला.
ट्रेंडिंग न्यूज
अजय काळे (वय ६२) असे दरीत कोसळून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. हा पर्यटक सुमारे ४०० फुट खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. किल्ले लिंगाणा हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असला तरी या किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हे तालुक्यातून मार्ग आहे. पनवेल येथील एक ट्रेकरचा ग्रुप ट्रेकिंगसाठी लिंगाणा किल्यावर आला होता. अनुभवी ट्रेकर्स असणारे अजय काळे हे ट्रेकिंग दरम्यान चक्कर येऊन खोल दरीत कोसळले. कांबळे हे तब्बल ४०० फूट खोल दरीत कोसळले. दरम्यान त्यांच्या ग्रुपमधील काहीनी त्यांचा शोध घेतला. मात्र, दरी खोल असल्याने त्यांचा शोध घेण्यास उशीर झाला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
किल्ल्यांचा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे. या किल्यावर ट्रेकिंग साठी आणि पर्यटनासाठी नागरिक येत असतात. मात्र, या ठिकाणी येणारे नागरीक हे काळजी घेत नसल्याने दुर्घटना होत असतात. अक्षय कांबळे हे अनुभवी ट्रेकर आहेत. त्यांचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
विभाग