मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime:पुण्यात मावळात सात वर्षांच्या मुलीचा अपहरण करून खून; २४ तासात प्रकरणाचा उलगडा

Pune Crime:पुण्यात मावळात सात वर्षांच्या मुलीचा अपहरण करून खून; २४ तासात प्रकरणाचा उलगडा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 04, 2022 01:12 AM IST

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सात वर्षांच्या मुलीचे अपहरण करून खून करण्यात आला आहे.

Crime News
Crime News (HT_PRINT)

पुणे : मावळ तालुक्यातील एका ७ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या खुणाचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. खून झालेली बालिका पवन मावळातील एका गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरीत शिकत होती. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ती घराच्या परिसरातून बेपत्ता झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय २४) याला युवकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि २) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही मुलगी तिच्या घराच्या आवारातून बेपत्ता झाली होती. तिच्या आईवडिलांनी तिचा शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. कामशेत पोलीसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. अपहरणाचा गुन्हा दाखल करुन मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद मोहिते, लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी गावात भेट दिली. मुलीचा शोध घेत असताना तिचा मृतदेह हा जिल्हा परिषदेच्या शाळेमागे सापडला. पोलिसांनी या प्रकरणी तेजस दळवी याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दळवी याने बालिकेचे अपहरण करुन खून करण्यात आल्याचे उघडकीस आले.

बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर बालिकेचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबतची माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.

IPL_Entry_Point

विभाग