मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ambegaon: आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी गेलेली शाळेची बस दरीत कोसळली; बसमध्ये होते ४४ विद्यार्थी

Ambegaon: आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी गेलेली शाळेची बस दरीत कोसळली; बसमध्ये होते ४४ विद्यार्थी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 27, 2022 04:50 PM IST

Student bus accident : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे घोडा येथील मुक्ताई प्रशालेची सहल ही गिरवली येथील आयुकाची दुर्बिण येथे गेली होती. दरम्यान दुर्बिण पाहून सहलीवरून परत येत असताना ही बस दरीत कोसळली. बसमध्ये ४४ विद्यार्थी आणि ३ शिक्षक होते.

दरीत कोसळलेली बस
दरीत कोसळलेली बस

पुणे : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे घोडा येथील मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी हे गिरवली येथील आयुकाची दुर्बिण पाहायला गेले होते. दरम्यान परत येत असताना ही बस दरीत कोसळली. या बसमध्ये ४४ विद्यार्थी आणि ३ शिक्षक होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, काही विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी विद्यार्थ्याना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आहे आहे. ही दुर्घटना आज दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

आंबेगाव तालुक्यात गिरीवली येथे आयूकाची दुर्बिण आहे. गिरवली हे उचं डोंगरावर वसले आहे. येथे जाणार रस्ता हा तीव्र वळणाचा आहे. ही दुर्बिण पाहण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे घोडा येथील मुक्ताई प्रशालेची सहल सकाळी गेली होती. एका बस मधून तब्बल ४४ विद्यार्थी आणि ३ शिक्षक हे ही दुर्बिण पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान ही दुर्बिण पाहून झाल्यावर विद्यार्थी हे बस मधून परत खाली येत असताना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले. यामुळे ही बस थेट दरीत जाऊन कोसळली. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने बस मधून मुलांना बाहेर काढले.

या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील ८ विद्यार्थी हे गंभीर असून त्यांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून काही मुलांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या बाबत आंबेगावचे गटविकास अधिकारी जलींधर पठारे म्हणाले, सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहेत. त्यातील गंभीर जखमी मुलांना मंचर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर काही जखमी मुलांना घोडेगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. आम्ही अपघात कसा झाला याची माहिती घेत आहोत.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या