मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune crime : खळबळजनक ! सेक्स करण्यासाठी मुलगी देतो म्हणत सेल्स मॅनेजरचे अपहरण करून लुटले; ब्लॅकमेल करूनही उकळले पैसे

Pune crime : खळबळजनक ! सेक्स करण्यासाठी मुलगी देतो म्हणत सेल्स मॅनेजरचे अपहरण करून लुटले; ब्लॅकमेल करूनही उकळले पैसे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 06, 2022 01:01 PM IST

Pune crime : पुण्यात शरीर संबंधांसाठी मुलगी देतो या आमिषाला बळी पडणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. त्याचे अपहरण करून त्याला लुटण्यात आले. एवढेच नाही तर ही बाब त्याच्या पत्नीला सांगेन असे म्हणत त्याला ब्लॅकमेल देखील करण्यात आले आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीला शरीर संबंधासाठी मुलगी देतो असे आमिष दाखवत त्याचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याला मारहाण करत त्याच्या जवळील एवज लुटण्यात आला. एवढेच नाही तर त्याच्या बायकोला ही बाब सांगेल अशी धमकी देत ब्लॅकमेळ करूनही पैसे उकळण्यात आले आहे. ही घटना विश्रांतवाडी परिसरात घडली.

या प्रकरणी एका ५३ वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानसुयर १७ ते१९ वर्ष वयाच्या चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धीरज वीर (वय १९) आणि जॉय मंडल (वय १९ ) यांच्यासह दोन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना ३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित फिर्यादी हे एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ते कामानिमित्त एका लॉजवर गेले असतांना त्यांची ओळख आरोपींसोबत झाली. दरम्यान त्यांना शरीर संबंधासाठी मुलगी देतो असे आमिष दाखवून आरोपींनी त्यांना बंडगार्डन परिसरात बोलावले. फिर्यादीहे त्यांच्या कार ने त्या ठिकाणी आल्यावर आरोपींनी त्यांचे अपहरण करत त्यांना मारहाण केली. त्यांचे एटीएम कार्ड काढून घेतले आणि येरवडा परिसरातील एका एटीएम मधून २५ हजार रुपये त्यांनी जबरदस्तीने काढले.

यानंतर ही बाब त्यांच्या पत्नीला सांगन्याची धमकी देत यांच्याकडून ९३ हजार रुपये ब्लॅकमेल करून लुटले. यानंतर आणखी पैसे मागत त्यांना जीवे मारण्याची धमकी त्यांनी फिर्यादीला दिली. यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटकही केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग