करणी केल्याच्या संशयातून पुजाऱ्याची दगडाने ठेचून हत्या; पुण्यातील भोर तालुक्यातील घटना-a priest was stoned to death on suspicion of doing karani bhor taluka incident in pune ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  करणी केल्याच्या संशयातून पुजाऱ्याची दगडाने ठेचून हत्या; पुण्यातील भोर तालुक्यातील घटना

करणी केल्याच्या संशयातून पुजाऱ्याची दगडाने ठेचून हत्या; पुण्यातील भोर तालुक्यातील घटना

Sep 26, 2024 04:53 PM IST

Pune Bhor Murder: पुण्यातील भोर तालुक्यात गुंजवणी नदी शेजारी हातवे खुर्द येथे सापडलेल्या मूर्त देहाच्या घटनेचा उलगडा झाला असून करणी केल्याच्या संशयातून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

करणी केल्याच्या संशयातून पुजाऱ्याची दगडाने ठेचून हत्या; पुण्यातील भोर तालुक्यातील घटना
करणी केल्याच्या संशयातून पुजाऱ्याची दगडाने ठेचून हत्या; पुण्यातील भोर तालुक्यातील घटना

Pune Bhor Murder: पुणे जिल्ह्यातील हातवे खुर्द येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गुंजवणी नदीच्या एका पुला शेजारी आढळलेल्या एका मृत व्यक्तीच्या खुनाचा छडा ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने लावला आहे. करणी केल्याच्या संशयातून एका इस्टेट एजंटने पुजाऱ्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपत गेनबा खुटवड (वय ५२, रा. हातवे खु ा, ता. भोर, जि. पुणे) असे खून झालेल्या पुजाऱ्याने नाव आहे. तर स्वप्नील खुत्वड (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संदिप अरूण खुटवड (रा. हातवे खुर्द) यांनी राजगड पोलीस ठाण्यात तकर दिली होती.

पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहिती नुसार, गणपत खुटवड हे गावातील देवऋषी म्हणजेच पुजारी असून ते गावातील काळूबाई मंदिराची देखभाल करत होते. गावात ते प्रसिद्ध होते. तर आरोपी स्वप्नील हा गावात इस्टेट एजंट म्हणून काम करतो. गणपत खुटवड यांच्या मृतदेह हा हातवे बुद्रुक गावाजवळील गुंजवणी नदीच्या पुलाजवळ नदीपात्रात सोमवारी मिळाला होता. तर त्यांची मोटार सायकल पुलावर सापडली होती. त्यांच्या खुनाच्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला होता. तसेच ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने देखील या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता.

पोलिसांनी मृत गणपत खुटवड यांच्या दिनक्रमाची माहिती घेतली. तसेच गावपातळीवर चौकशी केली असता, त्यांचे व गावातील स्वप्निल खुटवड यांच्या सोबत वाद आल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी अटक केली. याची कसून चौकशी केली असता स्वप्नील याने खुनाची कबुली दिली.

कशी केली हत्या ?

गणपत खुटवड हे रविवारी हातवे खु गावातून नसरापूर येथे गेले होते. त्यांचा. पाठलाग करत स्वप्निल खुटवड हा देखील नसरापूर येथे गेला होता. गणपत खुटवड हे रात्री १०.३० च्या सुमारास नसरापूर येथून हातवे गावाकडे जात असताना त्यांचा पाठलाग स्वप्निल खुटवड याने केला. दरम्यान गुंजवणी नदीच्या पुलाजवळ गणपत खुट्वड यांना गाठून त्यांची दगडाने ठेचून स्वप्नीलने हत्या करून पसार झाला.

का केली हत्या?

पोलिसांना गुप्त बातमीदारांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी स्वप्निल खुटवड याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फोन बंद आला. त्यामुळे त्याच्यावरचा संशय वाढल्याने त्याला खेड शिवापूर परीसरातून अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता स्वप्निल खुटवडने समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे अभिजीत सावंत व राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुंन्ह्याची कबुली दिली. आरोपी स्वप्निलचे रेशनिंग दुकान आहे. तर मृत गणपत गावातील काळुबाई देवीच्या मंदिरात देवऋषी म्हणजेच पुजारी होते. गणपत याने करणी केल्याचा संशय स्वप्निल खुटवड याला होता. त्यामुळे आपली प्रगती होत नसल्याचे व रेशनिंग मिळण्याचे बंद झाले, व त्याची आर्थिक प्रगती होत नाही, असा स्वप्निलचा गैरसमज झालेला होता. यामुळे स्वप्निल खुटवडच्या मनात गणपत खुटवड यांच्याबाबत राग होता. स्वप्निल खुटवड याने या गैरसमजातून रागाच्या भरात गणपत खुटवड यांचा नसरापुर ते हातवे जाणारे रोडवर पाठलाग करून हातवे बुद्रुक गावाजवळील गुंजवणी नदीचच्या पुलाजवळ त्यांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्या डोक्यावर दगडाने मारहाण करून त्यांचा खून केला व त्यांचा मृतदेह नदीपात्रात टाकून त्यांची मोटार सायकल पुलावर सुरक्षा कठड्यालगत अडकवून ठेवली जेणेकरून अपघात झाल्याचा बनाव रचला. मात्र, त्याचा बनाव हा फोल ठरला व पोलिसांनी आरोपी स्वप्निल खुटवड याला अटक केली.

Whats_app_banner
विभाग