मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Fatka gang news : फटका गँगमुळे प्रवाशाने गमावला हात! ठाण्याजवळच्या दिवा रेल्वे स्थानकावरील घटना

Fatka gang news : फटका गँगमुळे प्रवाशाने गमावला हात! ठाण्याजवळच्या दिवा रेल्वे स्थानकावरील घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 21, 2024 09:12 AM IST

Diva news : दिवा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या एका रेल्वेतील प्रवाशाच्या हातातून एका चोरट्याने मोबाइल हिसकला. यामुळे तोल जाऊन खाली पडल्याने एका प्रवाशाचा हात खांद्यापासून निखळला.

Diva railway station crime news
Diva railway station crime news

Diva railway station crime news : दिवा रेल्वेस्थानकात येणाऱ्या एका लोकलमधील प्रवाशाच्या हातातील मोबाइल एका फटका गँग मधील चोरट्याने हिसकल्याने प्रवासी तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा डावा हात खांद्यापासून निकामी झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून रेल्वे पोलिसांनी चोरट्याला अटक केली. दरम्यान, या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे स्थानकात फटका गँग पुन्हा सक्रिय झाल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ही घटना रविवारी रात्री फलाट क्रमांक दोनवर घडली.

buldhana food poisoning news : बुलढण्यात उपवासाची भगर आणि आमटी खाल्याने ६०० जणांना विषबाधा

मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत कुमार (वय २२) असे डावा हात गमावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. गणेश शिंदे (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकांत कुमार हे नवी मुंबईतील घणसोली येथील रहिवाशी आहेत. ते रविवारी वांगणी येथे त्यांच्या बहिणीच्या घरी तिला भेटण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री ते लोकलमधून परत घरी येत होते.

Maharashtra weather update : राज्यावर अवकाळी पावसाचे संकट; 'या' जिल्ह्यात बरसणार, असे असेल हवामान

यावेळी लोकलमध्ये मोठी गर्दी असल्याने शशिकांत हे दरवाज्यात उभे होते. यावेळी त्यांचा फोन हा त्यांच्या हातात होता. त्यांची गाडी ही रात्री ११.५५ मिनिटांनी दिवा स्थानकात आली. गाडी ही थोड्या वेगात स्थानकात येत होती. दरम्यान, ही संधि साधून आरोपीने शशिकांत यांच्या हातावर जोरदार फटका मारत त्यांच्या हातातील मोबाइल ओढला. त्यांनी मोबाइल घट्ट पकडला असल्याने त्यांचा तोल जाऊन शशिकांत हे खाली पडले.

यावेळी ते प्लॅटफॉर्म आणि लोकलगाडीच्या मधल्या जागेत ते पडल्याने त्यांचा डावा हात हा लोकलखाली आल्याने खांद्यापासून तुटला. दरम्यान, प्रवाशांनी तातडीने चोरट्याला अटक केली व शशिकांत शिंदे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग