Kolhapur Murder news : कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथे रविवारी घडली. लष्करात असलेल्या तसेच सुट्टीवर आलेल्या एका जवानाने तिघांच्या मदतीने गावातील एका तरुणाची लाकडी दांडक्याने मारहाण करून ट्याच्या आई समोरच त्यांची हत्या केली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी लष्करी जवान आणि अन्य तिघे फरार झाले आहेत.
विकास आनंदा पाटील (वय ४०, रा. पोर्ले तर्फे ठाणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर जवान युवराज शिवाजी गायकवाड (वय ४०, रा. पोर्ले तर्फे ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. तर इतर तिघे आरोपी फरार आहे. या सर्वांवर पन्हाळा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकास व युवराज यांच्यामध्ये काही कारणावरून वाद सुरू होते. युवराज हा भारतीय सैन्य दलामध्ये आहे. तो फेब्रुवारीमध्ये सुट्टीवर गावात आला होता. यावेळी खून झालेल्या विकास आणि युवराज यांच्यात मोठे वाद झाले होते. दरम्यान, हा वाद झाल्यावर आरोपी युवराज हा पुन्हा त्याच्या कर्तव्यावर निघून गेला होता. दरम्यान, युवराज हा पुन्हा शनिवारी सुट्टीवर गावात आला होता. मात्र, त्याने तीन मित्रांच्या साह्याने विकास आणि त्याची आई दुचाकीवरून दूध घेऊन शेतातून घरी जात असताना रस्त्यात गाठले.
आरोपी हे मोटारीतून आले होते. त्यांनी विकासची दुचाकी अडवली. यावेळी गाडीतून उतरलेल्या चौघांनी तोंडाला मास्क लावला होता. या सर्वांनी विकासला विकसला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात विकासच्या डोक्यात गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याच्या आईंने आरडा आरोडा केला. आरोपींनी त्यांना देखील मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पळ काढला.
दरम्यान, विकासला दवाखान्यात भरती करण्यात आले येथील सीपीआरमध्ये उपचारासाठी आणले असता, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झालं. विकासच्या मागे आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. नेमका वाद कोणत्या कारणातून होता याची माहिती समजू शकली नाही. या घटनेमुळे गावात तनावाचे वातावरण आहे.
संबंधित बातम्या