मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भुजबळ कुटुंबीयांना उपरती! जमीन बळकावल्याच्या आरोपानंतर पीडित महिलेला २० वर्षांनी दिली भरपाई

भुजबळ कुटुंबीयांना उपरती! जमीन बळकावल्याच्या आरोपानंतर पीडित महिलेला २० वर्षांनी दिली भरपाई

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 02, 2024 11:31 AM IST

Chhagan Bhujbal : मुंबई येथील सांताक्रूझ येथील बंगला बळकवल्याचे आरोप झाल्यावर मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियाना उपरती झाली असून तब्बल २० वर्षांनी पीडित वृद्ध महिलेला ८ कोटी रुपयांची थकीत रक्कम देण्यात आली आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal (PTI)

minister Chhagan Bhujbal of grabbing a bungalow in Santacruz भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबावर सांताक्रूझ येथील वृद्ध ख्रिश्चन महिलेचा बंगला बळकावल्याचा जाहीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. या आरोपा नंतर भुजबळ कुटुंबीयांना उपरती झाली असून वृद्ध महिलेची थकीत रक्कम तब्बल २० वर्षांनी त्यांना परत देण्यात आली आहे. या वृद्ध महिलेला ८.४ कोटी रुपयांची थकीत रक्कम परत देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या मालकीच्या परवेश कन्स्ट्रक्शनने ही थकबाकी जमा केली आहे.

Pune News: पुणेकरांना दिलासा! शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार; पेट्रोल डिझेल असोसिएशनचा निर्णय

छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे दोघेही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत. सांताक्रूझ येथे डोरीन फर्नांडिस (वय ७८) या वृद्ध महिलेचा बंगला आहे. त्यांना ऑटिस्टिक आजाराने ग्रस्त असलेली तीन मुळे आहेत. त्यांचा बंगला हा भुजबळ कुटुंबीयांनी बळकावला होता. या संदर्भात अंजली दामानिया यांनी भुजबळ कुटुंबीयांवर आरोप केला होता. यानंतर तब्बल २० वर्षांनंतर अखेर डोरीन फर्नांडिस यांची थकबाकी परत मिळाली आहे.

Ayodhya Ram Moorti : राम मंदिरात स्थापित होणारी मूर्ती ठरली; ‘या’ मूर्तिकाराने साकारले प्रभू रामाचे मनमोहक रूप

दमानिया यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. ७८ वर्षांच्या आईला आता तिच्या तीन ऑटिस्टिक मुलांच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही, असे त्यांनी ट्विट केले आहे. या बाबत मदत केल्याबद्दल दमानिया यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले. भुजबळ कुटुंबीयांना थकबाकी भरायला लावल्याबद्दल दमानिया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले आहेत.

या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे आणि त्यानंतर कंपनीने त्यांना पैसे परत दिले आहेत. दमानिया यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये पुन्हा या बाबत भुजबळ यांना धारेवर धरले होते. एका मेळाव्यात भुजबळ यांनी आम्ही आमच्या मेहनतीचे फळे खातो असे म्हटले होते. या व्यक्तीव्यावरुन दमानिया यांनी भुजबळ यांना डोरीन यांच्या बंगल्याची आठवण करून तो बळकावल्याचा आरोप केला होता. दमानिया म्हणाल्या की, फर्नांडिस कुटुंबाने १९९४ मध्ये पाच फ्लॅटच्या बदल्यात त्यांचे बंगले रहेजांना पुनर्विकासासाठी दिले होते.

विकासकाने ते समीर भुजबळ यांच्या परवेश कन्स्ट्रक्शनला विकले, या ठिकाणी बहुमजली इमारत बांधली गेली. मात्र, फर्नांडिस कुटुंबाला काहीही मिळाले नाही. समीर भुजबळ यांनी हे आरोप फेटाळून लावले असून त्यांनी रहेजा कंपनीकडून मालमत्ता खरेदी केल्याचा दावा केला होता. त्यांनी कुटुंबाचे काहीही देणेघेणे नसले तरी त्यांनी त्यांना मदत करण्याची भूमिका घेत ५० लाख रुपये देऊ केले. पण त्यांनी ते स्वीकारले नाही,

WhatsApp channel