अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेलं! उत्तेजक गोळ्या खाऊन शरीरसंबंध ठेवताना एकाचा मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेलं! उत्तेजक गोळ्या खाऊन शरीरसंबंध ठेवताना एकाचा मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना

अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेलं! उत्तेजक गोळ्या खाऊन शरीरसंबंध ठेवताना एकाचा मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना

Nov 05, 2024 10:23 AM IST

Mumbai Crime news : मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेलं. तसेच त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करत असतांना त्याचा मृत्यू झाला. उत्तेजक गोळ्या घेतल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.

अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेलं...उत्तेजक गोळ्या घेऊन अत्याचार करतांना एकाचा मृत्यू! मुंबईतील धक्कादायक घटना
अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेलं...उत्तेजक गोळ्या घेऊन अत्याचार करतांना एकाचा मृत्यू! मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime news : मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीसही चक्रावले आहे. गुजरातच्या सूरत येथील एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीला मुंबईतील ग्रॅण्ट रोड येथील हॉटेल सुपर येथे नेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने काही उत्तेजक गोळ्या घेतला. मात्र, शरीर संबंध ठेवतांना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी मृत आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितलं.

संजय कुमार रामजीभाई तिवारी (वय ४२) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. हा व्यक्ति गुजरात येथील सूरत असून तो एका अल्पवयीन मुलीला घेऊन मुंबईत आला होता. दरम्यान, त्याने खोट्या आधार कार्डच्या मदतीने मुलीला ग्रॅण्ट रोड येथील हॉटेल सुपरमध्ये नेले. या ठिकाणी मुलीवर अत्याचार करण्यापूर्वी त्याने उत्तेजक गोळ्या घेतल्या. मात्र, शरीर संबंध ठेवत असतांना त्याचा मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण ?

संजय कुमार रामजीभाई तिवारी हा एका अल्पवयीन मुलीला घेऊन मुंबईत आला होता. त्याने एक हॉटेल बूक केले. अल्पवयीन मुलगी ही त्याची मुलगी असल्याचं त्यांन खोट सांगितलं. हॉटेलमध्ये असतांना मुलीशी शरीर संबंध ठेवत असतांना तो बेशुद्ध पडला. शनिवारी ही घटना घडली. हा प्रकार समजल्यावर हॉटेल मॅनेजरने सायंकाळी ६.१५ वाजता पोलिसांना फोन करत हॉटेलमधील एक व्यक्ती रुममध्ये बेशुद्ध पडल्याची माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संजय कुमारला जवळील जेजे रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले. संजय ज्या खोलीत होता, तेथे अल्पवयीन मुलगी देखील होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी करत तिच्या पालकांशी संपर्क साधला. यावेळी ती मृत व्यक्तिची मुलगी नसल्याचं समजलं. मुलीच्या पालकांनी मृत व्यक्तीने त्यांच्या मुलीवर अत्याचार केल्याचं सांगितलं. यानंतर त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हॉटेलरूममध्ये पोलिसांना आढळली उत्तेजक औषध

पोलिसांनी हॉटेल रूमची तपासणी केली असता, त्या ठिकाणी त्यांना काही उत्तेजक औषध मिळाली. तिवारीने मुलीशी शरीर संबंध ठेवण्याच्या आधी अती प्रमाणात ही औषधं घेतल्याचा अंदाज आहे. मात्र, मृत्युचं खरं कारण हे शवविच्छेदन अहवालाल आल्यावर कळणार आहे.

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर