नागपुरात चाललंय काय? अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो, व्हिडीओ केले व्हायरल-a minor girl was raped and tortured in nagpur accused dig girl photos and videos viral ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नागपुरात चाललंय काय? अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो, व्हिडीओ केले व्हायरल

नागपुरात चाललंय काय? अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो, व्हिडीओ केले व्हायरल

Aug 13, 2024 09:23 AM IST

Nagpur Crime : नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुरात चाललयं काय ? अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो, व्हिडीओ केले व्हायरल
नागपुरात चाललयं काय ? अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो, व्हिडीओ केले व्हायरल

Nagpur Crime news : नागपूर येथे गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खून, दरोडे, दारू पिऊन गाडी चालवणे, या सारख्या घटना वाढल्या आहेत. याचबरोबर आता महिलांवरील अत्याचार देखील वाढले आहे. नागपूरमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. देशात कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आला होता. या घटनेचा निषेध होत असतांना नागपूर येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे फोटो आणि व्हिडिओ आरोपीने व्हायरल केले आहे. या घटनेमुळे शहरात संताप उसळला असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या महितीनुसार ही वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यात एक महाविद्यालयीन विद्यार्थी यात आरोपी आहे. साहील सिद्धार्थ नितनवरे (१९, डिफेन्स कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि मुलीची ओळख ही ऑगस्ट २०२१ मध्ये झाली. आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दरम्यान, त्याने तिला एका निर्जन स्थळी घेऊन गेला. या ठिकाणी त्याने तिला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ देखील काढले होते. 

दरम्यान, त्याने तिचे तसले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. मुलीने विरोध केला असता त्याने तिला मारहाणदेखील केली. तब्बल दोन वर्ष तिने आरोपीचा अत्याचार सहन केला. मात्र, तिच्या संयमाचा बांध फुटल्यावर तिने तिच्यावर बेतत असलेला प्रसंग पालकांना सांगितला. तिच्या आईवडीलांनी मुलाला जाब विचारला असता त्यांना देखील आरोपीने धमकावत मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आरोपीने मुलीच्या नातेवाईकांना तिचे अश्लिल फोटो व व्हिडीओ पाठवले व ते फोटो सोशल मिडियावर पोस्ट देखील केले. दरम्यान, ही बाब पुढे आल्यावर मुलीने वाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी साहीलविरोधात पोक्सो अॅक्ट तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी साहील नितनवरेला अटक केली आहे. सध्या त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

विभाग