मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pawane MIDC fire : पावणे एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग; अग्निशामक दल घटनास्थळी रवाना

Mumbai Pawane MIDC fire : पावणे एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग; अग्निशामक दल घटनास्थळी रवाना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 04, 2024 10:54 AM IST

Mumbai Pawane MIDC fire : मुंबईतील पावणे औद्योगिक वासाहतीत एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती, की धुराचे लोट दुरवरून दिसत होते.

 MIDC Pawane
MIDC Pawane

Mumbai Pawane MIDC fire : मुंबईतील पावणे औद्योगिक वसाहतीत भीषण एका रासायनिक कंपनीला सकाळच्या सुमारास भीषण आग लागणी. आगीने काही क्षणात उग्र रूप धारण केले. आग वेगाने पसरल्याने कामगारांची मोठी धावपळ झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी रवाना झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली याची माहिती समजू शकली नाही.

Arvind Kejriwal : ईडीनं तीन समन्स धाडूनही केजरीवाल गैरहजर! कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

पावणे एमआयडीसीत असणाऱ्या मेहके केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड येथे ही आग लागली. आज सकाळी ९ च्या सुमारास कंपणीतून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. काही कळायच्या आत मोठ्या प्रमाणात आग पसरली. काही क्षणात कंपनीने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही आग एवढी भीषण होती की, धुराचे लोट दूरवरुन दिसत होते.

Maharashtra weather update : राज्यात धुळे, जळगाव, नंदुरबारला बसणार अवकाळीचा तडाखा; असे आहे आजचे हवामान

दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. येथील औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. आग उग्र आल्याने नियंत्रण मिळवतांना अडचणी येत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही, मात्र, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या औद्योगिक वासातीती मोठ्या कंपन्या आहेत. मेहके केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही रासायनिक कंपनी आहे. येथे असणाऱ्या रासायनिक पदार्थामुळे आगीने वेगाने पेट घेतला असल्याचे आढळले.

WhatsApp channel

विभाग