Pune murder : विवाहितेशी लग्न करणे बेतले जिवावर! बुधवार पेठेत वस्तऱ्याने गळा पहिल्या पतीने केला दुसऱ्या पतीचा खून
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune murder : विवाहितेशी लग्न करणे बेतले जिवावर! बुधवार पेठेत वस्तऱ्याने गळा पहिल्या पतीने केला दुसऱ्या पतीचा खून

Pune murder : विवाहितेशी लग्न करणे बेतले जिवावर! बुधवार पेठेत वस्तऱ्याने गळा पहिल्या पतीने केला दुसऱ्या पतीचा खून

Feb 11, 2024 09:45 AM IST

Pune Budhvar peth murder : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शुक्रवारी रात्री बुधवार पेठेत क्रांती चौकात एकाचा वस्तऱ्याने गळा कापून खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Pune Budhvar peth murder
Pune Budhvar peth murder

Pune Budhvar peth murder : पुण्यात एका विवाहित महिलेशी लग्न करणे एकाच्या जिवावर बेतले आहे. बुधवार पेठेत पहिल्या पतीने महिलेच्या दुसऱ्या पातीचा ववस्तऱ्याने गळा कापून खून केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारपेठेतील क्रांति चौकात शुक्रवारी रात्री घडली. फरार होणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी रेल्वे स्थानकातून अटक केली आहे.

samruddhi mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर कारची अवजड वाहनाला धडक, तिघे जागीच ठार, दौलताबाद येथील घटना

नईम शेख असे खून झालेल्याचे नाव आहे. तर कलाम उर्फ रूबेल शेख असे आरोपीचे नाव आहे. फरासखाना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील महिला राहायला आहे. आरोपी कलाम शेख हा तिचा पती आहे. सहा महिन्यांपूर्वी तिने नईम शेख याच्याशी विवाह झाला होता.

kapil dev: कपिलदेव झाले कर्जतकर! १६ एकर जमिन केली खरेदी, नेरळच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चाहत्यांची गर्दी

दरम्यान, दोघेही एकत्र राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पत्नीने लग्न मोडून दुसऱ्याशी लग्न केले होते. यामुळे कलाम चिडला होता. त्याने नईमचा खून करण्याचे ठरवले. तो त्याच्या मागावर होता. तो कुठे जातो कुठे नाही याची सर्व माहिती त्याने त्याच्यावर पाळात ठेऊन काढली होती. शुक्रवारी बुधवार पेठेतील क्रांती चौकात सागर बिल्डींगजवळ शुक्रवारी सायंकाळी कलाम थांबला होता. काही वेळानंतर नईम तेथे आला.

यावेळी तो बेसावध असल्याची संधि साधून त्याने खिशातून वस्तरा काढत नईमच्या गळ्यावर चालवला. यावेळी याने वार वस्तऱ्याने नईम केले. यात नईम हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर आरोपी कलाम घटनास्थळावरून पसार झाला. तो साथीदारासोबत पश्चिम बंगालला जाण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी त्याला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून त्याला साथीदारासह अटक केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर