मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sambhaji nagar crime : संभाजीनगर हादरले! उधारीची पैसे मागितल्याने तरुणाची गोळ्या घालून हत्या

sambhaji nagar crime : संभाजीनगर हादरले! उधारीची पैसे मागितल्याने तरुणाची गोळ्या घालून हत्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 10, 2023 09:20 AM IST

sambhaji nagar firing News : संभाजी नगर गोलिबाराच्या घटनेने हादरले. उधारीचे साडेसात हजार रुपये मागितल्याने एका अट्टल गुन्हेगाराने तरुणाला भर रस्त्यात गोळ्या घालून ठार मारले.

sambhajingar firing News
sambhajingar firing News

पुणे : संभाजी नगर शहर गोळीबाराच्या घटनेने हादरले. एका अट्टल गुन्हेगाराने उधारीचे साडे सात हजार रुपये दिले नाही म्हणून एका तरुणाला भर रस्त्यात गोळ्या घालून ठार मारले. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेत आणखी एक व्यक्ति जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ठार झालेल्या तरुणाचे ११ दिवसानंतर लग्न होते. न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरानगरमध्ये सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.

ट्रेंडिंग न्यूज

हमद अब्दुल्लाह सालेह कुतुब चाऊस (वय २४) असे ठार मारलेल्या तरुणाचे नाव आहे. तर रस्त्याने जाणारा इरफान पठाण हा जखमी झाला आहे. फय्याज पटेल (वय २७, रा. गल्ली क्रमांक २१, बायजीपुरा) असे गोळीबार करणाऱ्या अट्टल आरोपीचे नाव आहे.

Pune Metro: मेट्रो स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी ‘शेअर ए रिक्षा’; १८ स्थानकांपासून १०७ मार्ग निश्चित; रस्ते व दरही ठरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर फयाज आणि मृत हमद हे ओळखीचे होते. हमद हुसेन हा त्याच्याच कॉलनीत आईसोबत राहत होता. टु पैठणगेट येथे कपड्याच्या दुकानात कामाला होता. या महिन्यात २० तारखेला त्याचे लग्न होते. बुधवारी (दि ९) रात्री तो काम संपवून घरी जात असतांना तो टेलरकडे थांबला. यानंतर तो एका मित्रासोबत चहा पिऊन मेडिकल समोर उभा होता. यावेळी समोरुन आलेल्या आरोपी फयाजने गावठी कट्ट्यातून थेट हमदवर गोळीबार केला. पहिली गोळी हमदच्या कानाजवळून तर मेडिकलवर औषध घेण्यासाठी आलेल्या इरफान पठाण यांच्या हाताच्या लागली. तर दुसरी गोळी फयाजने थेट हमदच्या छातीत लागण्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

हमद याने फय्याज कडून काही दिवसांपूर्वी साडेसात हजार रुपये घेतले होते. हे पैसे परत न केल्याने फय्याजने हमदची हत्या केली. त्याला ठार मारल्यावर देखील फय्याज हा हमदच्या मृतदेहाला लाथाबुक्क्यांनी मारत होता. आरोपी फय्याज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी, घरफोडी, लूटमारीसह दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती.

WhatsApp channel