मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri-chinchwad : मोबाईल दिला नाही म्हणून संतापला! मैत्रिणीवर थेट घरात घरात घुसून कोयत्याने वार

Pimpri-chinchwad : मोबाईल दिला नाही म्हणून संतापला! मैत्रिणीवर थेट घरात घरात घुसून कोयत्याने वार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 08, 2024 06:14 AM IST

Pimpri-chinchwad crime news : पिंपरीचिंचवडमध्ये किरकोळ कारणावरून मैत्रिणीच्या घरात घुसून तिच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pune crime
Pune crime

Pimpri-chinchwad crime news : पुण्यात गुन्हेगारांना तंबी देऊनही गुन्हेगारी कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. किरकोळ कारणावरून खून, मारामारी आणि कोयता गँगची दहशत ही सुरच आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मोबाइल दिला नाही या किरकोळ कारणावरून एकाने थेट मैत्रिणीच्या घरात घुसून तिच्यावर कोयत्याने वर केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना काळेवाडी येथे सोमवारी दुपारी घडली.

NCP Crisis : पुण्यात राजकारण तापलं; राष्ट्रवादीच्या कार्यालयावरील ‘घड्याळ’ हटवलं, नेत्याला अश्रू अनावर

अविनाश शिवाजी लोखंडे (वय ३०, रा. गुळवे वस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी ही तिच्या मावस बहिणीच्या घरी राहते. ती घरी असतांना अविनाश हा तिच्या घरात घुसला. मुलगी ही मोबाईलवर बोलत असताना आरोपीने कोणाशी बोलत आहेस, म्हणून तिच्या हातातून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने मोबाइल देण्यास नकार दिला.

NCP Politics : शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव; निवडणूक आयोगानं काही वेळातच दिला निर्णय

याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या जवळील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही बाब तरूणीच्या मावस बहीणने पहिली असता तिला वाचवण्यासाठी ती मध्ये आली. मात्र, त्याने तिच्यावर देखील कोयत्याने वार केले. यात कोयता तरुणीच्या गालाला लागल्याने ती जखमी झाली. दरम्यान, फिर्यादी तरुणी ही यात गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी तरुणीने दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फौजदार माने करीत आहेत.

पुण्यात गुन्हेगारी करण्यासाठी सध्या पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. अनेक गुन्हेगारांना थेट पोलिस आयुक्तालयात बोलावून त्यांना कडक शब्दात इशारा देण्यात येत आहेत. पुण्यात मंगळवारी गुंड गजानन मारणे, बाबा बोडखे, नीलेश घायवळसह तब्बल ३०० गुंडांची ओळख परेड करून त्यांना समज देण्यात आली होती. कायदा हातात घेतल्यास सोशल मिडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला.

WhatsApp channel