churchgate news : मुंबईतील चर्चेगेट रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील एका बाकावर एक प्रवासी तब्बल ५ लाख रुपये रोख असलेली बॅग विसरून गेला होता. स्थानकावरील एका प्रवाशाच्या लक्षात ही बाब आली. त्याने कही बॅग पाहिली असता त्यात त्याला रोख रक्कम दिसली. या प्रवाशाने प्रामाणिकपणे ही बॅग स्थानक व्यवस्थापकाला सुपूर्द केली. तसेच याची माहिती रेल्वे पोलिसांना देखील दिली. बॅगेचा मालक बॅग शोधत स्थानकावर आला. त्याने स्थानक व्यवस्थापनाशी संपर्क साधल्यावर त्याला त्याची बॅग सुखरूप मिळाली. या घटनेतील प्रवाशाच्या प्रामाणिक पणाचं कौतुक केलं जात आहे.
मुंबईच्या चर्चेगेट रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एका प्रवाशाच्या प्रामाणिक पणामुळे एका प्रवाशाला त्याची पैशांनी भरलेली बॅग परत मिळाली आहे. भूपेश अगरवाल नामक व्यक्ति ही बॅग स्थानकावरच विसरला होता. दरम्यान, स्थानकावरून जात असलेल्या हेमप्रकाश पाटील या प्रवाशाच्या लक्षात ही बाब आली. त्याने ही बॅग पाहिली असता त्यात रोख रक्कम आणि मिठाईचा बॉक्स दिसला. त्याने ही बॅग स्वत: जवळ न ठेवता तसेच त्यातील रोख रक्कम न घेता ही बॅग स्थानक व्यवस्थापकाला दिली. काही वेळाने अगरवाल हे त्या ठिकाणी आले. व त्यांना त्यांची बॅग परत देण्यात आली.
प्रवाशांच्या सतर्कतेमुळे ५ लाखांची रोकड असलेली - बॅग मालकाकडे सुपूर्द करण्यात आली. चर्चगेट रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ४ वरील बाकड्यावर भूपेश अग्रवाल हे बॅग विसरले. बॅगेत रोख रक्कम व मिठाईचा पुडा होता. फलाटावरील बाकड्यावर बेवारस स्थितीत बॅग दिसून आली. बॅगेत रोख रक्कम असल्याने प्रवासी हेमप्रकाश पाटील यांनी स्थानक - व्यवस्थापकांकडे बॅग सुपूर्द केली. बॅगेची माहिती रेल्वे - सुरक्षा दलासह रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. दरम्यान भूपेश अग्रवाल चर्चगेट स्थानकात बॅग - हरवल्याची चौकशी करत स्थानक व्यवस्थापकांकडे पोहोचले. आरपीएफच्या मदतीने त्यांची चौकशी करून संपूर्ण खातरजमा केल्यावर अग्रवाल यांना रोख रक्कमेसह बॅग परत करण्यात आली.