मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune University traffic change: पुणे विद्यापीठातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतुकीत मोठा बदल; अशी आहे पर्यायी व्यवस्था

Pune University traffic change: पुणे विद्यापीठातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतुकीत मोठा बदल; अशी आहे पर्यायी व्यवस्था

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 11, 2024 11:22 AM IST

Pune University road traffic change : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल व मेट्रो पिलरचे काम चालु असल्याने चौकामध्ये रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, ही कोंडी सोडवण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आले आहे.

Pune traffic change
Pune traffic change

Pune University road traffic change : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल व मेट्रो पिलरचे काम चालु असल्याने चौकामध्ये रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, या कोंडीला नागरिक त्रासले आहे. यावरून अनेक संघटनांनी आंदोलने देखील केली आहे. अखेर या मार्गावरील ही कोंडी सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी येथील वाहतुकीत मोठा बदल केला आहे. त्यामुळे गणेशखिंड रोड, औध रोड, बाणेर रोडवर जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

खळबळजनक! अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने २० महिलांवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओही व्हायरल

अशी आहे पर्यायी वाहतूक व्यवस्था

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी औध रोडवरुन औंध, सांगवी, पिपरी चिंचवड, हिंजवडी परिसरामधील शिवाजीनगरकडे येणारी व शिवाजीनगर कडून औंध, सांगवी, पिंपरी चिंचवड, हिंजवडी कडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खालीलप्रमाणे बदल केलेल्या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

शिवाजीनगरकडून गणेशखिंड रोडने औंध, सांगवी, पिंपरी चिंचवड, हिंजवडी कडे जाणा-या बाहनचालकांनी एबिल हाऊस येथून उजवीकडे वळण घेवून सरळ रेंजहिल्स, सिंफनी चौक मार्गे साई चौक खडकी, डॉ. आंबेडकर चौक बोपोडी सरळ स्पायसर चौक मार्गे ब्रेमेन चौकातुन इच्छित स्थळी जावे.

samruddhi mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर कारची अवजड वाहनाला धडक, तिघे जागीच ठार, दौलताबाद येथील घटना

औंध गावाकडून शिवाजीनगर व पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रेगेन चौकातुन डावीकडे वळण घेवून सरळ स्पायसर जंक्शन, डॉ. आंबेडकर चौक, साई चौक खडकी, रेंजहिल्स चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.

एबिल हाऊस चौकामध्ये रेजहिल्सकडून येवून उजवीकडे वळण घेण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहिल.

गणेशखिंड रोडवरील संगण्णा धोत्रे पथ जाणे-येण्यास दुहेरी मार्ग सुरु राहिल.

गणेशखिंड रोडवरवील खाऊ गल्ली मार्ग ओम सुपर मार्केट सर्कलकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे व सिम्बायोसिस कॉलेज कडून खाऊ गल्लीतुन गणेशखिड रोडवर येण्यास बंदी राहिल.

गणेशखिंड रोडवरील उड्डाणपुल व मेट्रोचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत पुणे शहरातुन संचेती हॉस्पीटल चौकामधून गणेशखिंड रोडने विद्यापीठ चौक, औंध मार्गे पिंपरी चिंचवड, हिंजवडी या भागामध्ये जाणान्या व पिंपरी चिचवड, हिंजवडी भागामधून औध रोडने पुणे विद्यापीठ चौकामधुन संचेती हॉस्पीटल यौकामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या लक्झरी बसेसना शनिवार (दि. १०) पासून सकाळी ८ ते रात्री १०३० पर्यंत प्रवेश बंद राहिल.

ही वाहने जुना पुणे मुंबई महामार्गावरुन हॅरीस ब्रिजमार्गे पुणे शहरामध्ये यावे व शहरामधुन जावे किंवा बायपास रोड मार्गे कात्रज खडी मशिन चौक मार्गे जावे किंवा यावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

WhatsApp channel

विभाग