मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PUNE : जाग आली म्हणून वाचला.. बिबट्याचा उशाजवळ झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला, पाहा थरारक VIDEO

PUNE : जाग आली म्हणून वाचला.. बिबट्याचा उशाजवळ झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला, पाहा थरारक VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 24, 2023 09:14 PM IST

बिबट्याने पुण्यातील आंबेगाव तालुक्यात रात्रीच्या वेळी एका कुत्र्यावर हल्ला केला. यावेळी कुत्र्याजवळ झोपलेला व्यक्ती जाग आल्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला आहे.

बिबट्याचा उशाजवळ झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला,
बिबट्याचा उशाजवळ झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला,

पुणे - अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील काळंबा परिसरातील दत्तात्रय चव्हाण यांच्या घरापुढील पत्रा शेडमध्ये असणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. शेडमध्ये झोपलेले शहाजी शिंदे यांना जाग आल्याने ते बिबट्याच्या हल्ल्यात थोडक्यात बचावले. कुत्र्याच्या ओरडण्यामुळे शहाजी शिंदे यांना जाग येऊन ते बचावले आहेत. या परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे चार वाजता झाले आहे व सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

अवसरी बुद्रुक परिसरातील काळंबा परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड आहे. या परिसरातील ऊस तोडणीला आला आहे,दत्तात्रय चव्हाण यांच्याकडील कामगार शहाजी शिंदे व त्यांचा पाळीव कुत्रा पत्रा शेडमध्ये झोपलेले असताना बिबट्याने अचानक कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्या कुत्र्याला घेऊन जात असताना कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने शहाजी शिंदे यांना जाग आली व कुत्र्याला वाचविण्यासाठी शहाजी शिंदे मागे पळत सुटल्याने कुत्र्याला सोडून बिबट्याने पळ काढला नशीब बलवत्तर म्हणून कुत्रा व शहाजी शिंदे हे दोघेजण वाचले.

शहाजी शिंदे यांचे धाडस पाहून ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने काळ आंबा हिंगे वस्ती परिसरात पिंजरा लावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग