अंमली पदार्थ अन् विविध गुन्ह्यांचा भंडाफोड करणारा पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश! शासकीय सलामी देत अंत्यसंस्कार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अंमली पदार्थ अन् विविध गुन्ह्यांचा भंडाफोड करणारा पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश! शासकीय सलामी देत अंत्यसंस्कार

अंमली पदार्थ अन् विविध गुन्ह्यांचा भंडाफोड करणारा पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश! शासकीय सलामी देत अंत्यसंस्कार

Nov 27, 2024 12:42 PM IST

Pune Police dog Leo Death : पुणे पोलिसांचा मित्र असलेला व अनेक गुन्ह्यांची उकल करणाऱ्या लिओ श्वनाचे आजारपणामुळे निधन झाले. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक पोलिस भावुक झाले होते.

अंमली पदार्थ अन् विविध गुन्ह्यांचा भंडाफोड करणारा पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश! शासकीय सलामी देत अंत्यसंस्कार
अंमली पदार्थ अन् विविध गुन्ह्यांचा भंडाफोड करणारा पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश! शासकीय सलामी देत अंत्यसंस्कार

Pune Police dog Leo Death : पुणे पोलीसांचा लाडका लियोचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. लियोने पोलीसांसोबत मिळून अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. त्याने कोट्यवधी अंमली पदार्थाअसोबतच शस्त्रसाठा व चोरांचा माग काढला आहे. या लाडक्या लिओच्या पार्थिवावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याला निरोप देतांना पोलिस अधिकाऱ्यांना देखील अश्रु अनावर झाले होते.

श्वान लिओ हा लॅब्राडोर जातीचा श्वान होता. त्याचा जन्म २० जुलै २०१६ रोजी झाला होता. लिओने २० सप्टेंबर २०१६ रोजी पुणे पोलीस दलात दाखल होत त्याच्या सेवेला सुरुवात केली होती. लिओचा अंमली पदार्थ शोधण्यात हातखंड होता. त्याला यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आले होते. ‘लिओ’ने २८ डिसेंबर २०१९ रोजी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये पोलिसांसोबत महत्वाची कामगिरी करत एका नायजेरीयन व्यक्तीकडून व ५० किलो गांजा पकडून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतामधून ७० किलो गांजा पकडून दिला होता. या सोबतच २०१९ मध्ये कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नायजेरियन नागरिकाकडून अंमली पदार्थ आणि ५० किलो गांजा जप्त करण्यात लिओने महत्त्वाची भूमिका होती. या सोबतच पुणे रेल्वे स्थानक, बसस्थानक, येरवडा कारागृहात नियमितपणे अंमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी ‘लिओ’कार्यरत होता. लिओच्या घ्राणेंद्रिय इतर श्वानांपेक्षा तीक्ष्ण असल्याने त्याचा फायदा पोलिसांना मोठा फायदा झाला. लिओने भारतीय लष्कराच्या जवानांकरिता डेमो प्रात्यक्षिके तसेच विविध शाळांमध्ये प्रात्यक्षिके देखील सादर केले.

अन्ननलिकेच्या अजारामुळे मृत्यू

लिओ हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याला अन्ननलिकेचा आजार होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतांना त्याची प्राणज्योत मालवली.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ?

लिओवर महापालिकेच्या पशू दाहिनीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या शरीरावर तिरंगा झेंडा गुंडाळण्यात आला होता. तर, पोलिसांनी त्याला अंत्यसंस्कारापूर्वी बंदुकीच्या २१ फैरीझाडून मानवंदना देखील दिली. यावेळी अनेकांना अश्रु अनावर झाले होते. यावेवली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त, एमओबीचे पोलीस निरीक्षक, श्वान पथकाचे अधिकारी व कर्मचारी, सलामी गार्ड उपस्थित होते.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर