dombivali news : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ज्यूसमध्ये लघवी टाकून ते ग्राहकांना दिलं जात असल्याचं उघडं झालं होतं. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. आता आशीच काहीशी घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. एका फळ विकर्तेत्याचं घृणास्पद कृत्य व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही फळे खाणे सोडून द्याल. प्लॅस्टिकच्या पिशवीत लघवी केल्यावर या व्यक्ति ग्राहकांना फळांची विक्री करत असे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अली खान असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपी खान हा प्लॅस्टिकच्या पिशवीत लघवी करत असे. यानंतर आरोपी हात न धुता फळे विकत होता. ऐवढेच नाही तर तो लघवी केलेली प्लॅस्टिक बॅग गाडीवर ठेवत होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याची दाखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
या किळसवाण्या प्रकाराने डोंबिवली, पलावा, निळजे परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या फळ विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे निळजे बाजारपेठेत सुमारे दीड हजार लोकांचा जमाव जमला होता. यानंतर पालिकेच्या ई प्रभागाचे फेरीवाले हटाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तोपर्यंत तेथून सर्व फेरीवाले फरार झाले होते. पालिकेने या फेरीवाल्यावर कारावई करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये देखील दोन तरुण लघवी मिश्रित ज्यूस नागरिकांना प्यायला देत होते. ही बाब स्थानीक नागरिकांच्या लक्षात आल्यावर आरोपीला त्यांनी रंगेहात पकडले. एवढेच नाही तर त्याच्या दुकानांवरून लघवीचा कॅन देखील जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ज्यूस विक्रेत्याला व त्याच्या १५ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव आमिर असून नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्या ज्यूस सेंटरची तपासणी केली असता तेथून लघवीने भरलेला कॅन देखील सापडला.