Geminids Meteor Shower in December : खगोलप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यात महत्वाची खगोलीय घटना घडणार आहे. ही घटना डोळ्याने पाहता येणार आहे. १३ व १४ डिसेंबरच्या रात्री ही घटना होणार आहे. आकाशात पूर्व दिशेला उल्का वर्षाव होणार आहे. या उल्का वर्षावाला जेमिनिड्चा उल्का वर्षाव म्हणतात. हा उल्का वर्षाव लघुग्रह व ३२०० फेथॉन नावाच्या छोट्याशा खगोलीय वस्तूंमुळे होतो. खगोलीय भाषेत या वस्तूला धुमकेतू व लघुग्रह यामधली एक मानले जाते.
या वर्षी अनेक खगोलीय घटना घडल्या. यात चंद्र ग्रहण, सूर्य ग्रहण यांचा समावेश आहे. त्याच बरोबर या वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात उल्का वर्षाव नागरिकांना पाहता येणार आहे. हा उल्का वर्षाव खगोलप्रेमी व अभ्यासकांना साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. रात्री आकाशाचे निरीक्षण करतांना काही क्षणात प्रकाशरेषांचा वर्षाव आकाशात दिसणार आहे. अनेक जण या घटनेला ‘तारा तुटने’ असे म्हणतात. मात्र, प्रत्यक्षात तारा कधीच तुटत नसून या घटनेला उल्का वर्षाव महाथले जाते.
१८०० च्या दशकात पहिल्यांदा जेमिनीड उल्का वर्षावाची नोंद झाली. मात्र, त्यावेळी प्रति तास फक्त १० ते २० उल्का दिसत होत्या. नासाच्या मते, आज त्यांची संख्या ताशी १२० उल्कांपर्यंत वाढली आहे. सामान्यतः उल्कावर्षाव बर्फाळ धूमकेतूपासून उद्भवतात. पण, जेमिनीड उल्कावर्षाव अद्वितीय आहेत कारण ते खडकाळ पिंडांपासून निर्माण होतात.
दरवर्षी डिसेंबर महिन्यात पृथ्वी जेव्हा ३२०० फेथॉन खडकाळ लघुग्रहांच्या ढिगाऱ्याजवळून जातात, तेव्हा जेमिनीड सक्रिय होतात. जेव्हा या उल्केची धूळ आणि खडे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेव्हा ते पेट घेतात. जेमिनीड पृथ्वीच्या वातावरणातून ताशी ७८ हजार मैल वेगाने प्रवास करतात. मात्र, पृथ्वीच्या खूप वरच्या वातावरणातच पेट घेतात.
३२०० फेथॉनच्या स्वरूपाबद्दल खगोलशास्त्रज्ञ एकमत नाहीत. नासाच्या म्हणण्यानुसार, हा एकतर पृथ्वीच्या जवळचा लघुग्रह किंवा नामशेष झालेला धूमकेतू आहे. कधीकधी त्याला खडकाळ उल्का असेही म्हणतात. फेथॉनच्या कक्षेप्रमाणेच २००५ UD नावाचा अपोलो लघुग्रहाची देखील एक कक्षा आहे, जी त्याच मोठ्या खगोलीय पिंडाचा भाग असल्याचे म्हटले जाते आणि दुसऱ्या लघुग्रहाशी टक्कर झाल्यावर त्याचे दोन तुकडे झाले. हे नाव प्राचीन ग्रीक देव अपोलोच्या मुलाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. ३२०० फेथॉनला सर्वप्रथम १९८३ मध्ये इन्फ्रारेड खगोलशास्त्रीय उपग्रहाने टिपले होते.
संबंधित बातम्या