Pune Drunk Girl : पुण्यात ३१ डिसेंबरच्या रात्री एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणीने सोसायटीत तूफान राडा घातला. दारूच्या नशेत असलेल्या या तरुणीने सोसायटीतील नागरिकांना शिवीगाळ करत आवारातील सामानाची तोडफोड केली. एवढेच नाही तर तिला आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेजाऱ्यांना देखील तिने मारहाण केली. मात्र, ही तरुणी ऐकत नसल्याने अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र, या तरुणीने पोलिसांना देखील मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत घडली.
मिळालेल्या महितनुसार, ३१ तारखेला नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या तरुणीने मद्यपान केले. यानंतर ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत सोसायटीत आली. यानंतर तिने सोसायटीच्या आवारात धुडगूस घालण्यास सुरवात केली. सोसायटीत येताच शिवगाळ करत तिने वॉचमनसाठी असलेला टेबल आणि खुर्ची रस्त्यावर फेकून दिले. यानंतर सोसायटीत राहणाऱ्यांना ती शिवीगाळ करू लागली.
तिला रोखण्यासाठी आलेल्या सोसायटीतील काही शेजाऱ्यांना तिने शीवीगाळ करत मारहाण करू लागली. नशेत असलेल्या तरुणीनं सोसायटीचं गेट बंद केला. ती आवरत नसल्याने रहिवाशांनी पोलिसांना बोलावले. यावेळी या मुलीने महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली.
अखेर पोलिसी हिसका दाखवत तिला पकडण्यात आले. दरम्यान, माहितीत ही मुलगी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती मिळाली. यामुळे तिला सोडून देण्यात आल्याचे सोसायटीतील राहिवाशांचे म्हणणे आहे. सरत्या वर्षाला निरोप देत असतांना आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यात नागरीक मग्न असतांना या तरुणीने सोसायटीत येऊन राडा घातल्याने रहिवाशांना चांगलाच मनस्ताप झाला. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा राडा पाहून सोसायटीतील नागरिक संतत्प होऊन तरुणी भोवती जमले होते. तरी सुद्धा ती कुणाला जुमानत नव्हती.