gateway of india suicide : मुंबईत काही दिवसांपूर्वी कर्जबाजारी झाल्याने सी लींक वरून एका व्यावसायीकाने उडी मारून जीवन संपवलं होतं. तर चार दिवसांपूर्वी मरिन ड्राइव्ह येथे अंधेरीच्या तरुणीने आत्महत्या केली होती. या दोन्ही घटना ताज्या असतांना आता आणखी एक घटना उघडकीस आली आहे. रविवारी एका हिरेव्यापाऱ्याने गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात उडी मारून स्वत:चं जीवन संपवलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय शहा (वय ६५) असे या वृद्ध हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. व्यवसायात तोटा झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याकहा प्रथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय शहा हे महालक्ष्मी मंदिर परिसरात राहण्यास होते. ते हीरे व्यापारी असून गेल्या दोन तीन वर्षांपासून त्यांना त्यांच्या हिऱ्याच्या व्यवसायात मोठा तोटा झाला होता. यामुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. परिणामी हा तोटा कसा भरून काढायचा या विवंचनेत होते.
रविवारी सकाळी शहा हे वॉकिंगला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. ते टॅक्सीने थेट पकडली आणि वांद्रे वरळी सागरी सेतू येथून दोन ते तीन फेऱ्या मारून ते टॅक्सीने गेट वे ऑफ इंडिया येथे आले. यानंतर ते नॉर्थ कोर्ट कुलाबा येथे गेले. यावेळी त्यांनी कसलाही विचार न करता भरतीच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शहा यांना समुद्रातून बाहेर काढले. त्यांना जवळलील सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
काही दिवसांपूर्वी कर्जबाजारीपणाला कंटाळून मुंबईतील वरळी सी-लिंकवरून उडी मारून एका व्यापराने एका आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्येपूर्वी मुलाला फोन करून जीवन संपवत असल्याची माहिती दिली. भावेश सेठ असे या व्यावसायीकाचे नाव असून तयाकहा बॉल बेअरिंगचा व्यवसाय होता. या व्यवसायात तोटा झाल्याने आणि कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. या पूर्वी देखील एका बाप लेकानं लोकल खाली येत आत्महत्या केली होती.
संबंधित बातम्या