बारमधील बिलाच्या वादातून बाऊन्सरने केला अट्टल गुन्हेगाराचा खून; पुण्यातील सिंहगड रस्ता भागातील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बारमधील बिलाच्या वादातून बाऊन्सरने केला अट्टल गुन्हेगाराचा खून; पुण्यातील सिंहगड रस्ता भागातील घटना

बारमधील बिलाच्या वादातून बाऊन्सरने केला अट्टल गुन्हेगाराचा खून; पुण्यातील सिंहगड रस्ता भागातील घटना

Published Aug 23, 2024 02:37 PM IST

Pune Sinhgad Crime : पुण्यात बारमधील बिलाच्या वादावरून बाऊन्सरने एका अट्टल गुन्हेगारचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बारमधील बिलाच्या वादातून बाऊन्सरने केला अट्टल गुन्हेगाराचा खून; पुण्यातील सिंहगड रस्ता भागातील घटना
बारमधील बिलाच्या वादातून बाऊन्सरने केला अट्टल गुन्हेगाराचा खून; पुण्यातील सिंहगड रस्ता भागातील घटना

Pune Sinhgad Crime : पुण्यात सिंहगड रस्त्यावरील एका बारमध्ये बिलाच्या वादावरून बाऊन्सरने एका अट्टल गुन्हेगाराच्या डोक्यात हातोडीमारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाऊन्सरसह तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोट्या उर्फ अमोल शेजवाळ (वय ३४, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. आरोपीचे नाव समजू शकले नाही.

या घटनेचे वृत्त असे की, सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाजवळ असलेल्या क्लासिक बारमध्ये गुरुवारी मध्यरात्री शेजवाळ व त्याचे काही मित्र दारू पीत बसले होते. दारू पिऊन झाल्यावर १२.३० च्या सुमारास बिलावरून बारमधील मॅनेजर व शेजवाळ यांच्यात मोठा वाद झाला. या वादावरून त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत बारमधील बाऊन्सरने शेजवाळ याला गंभीर मारहाण केली. हाणामारी दरम्यान, बाऊन्सरने शेजारी असलेल्या पंक्चरच्या दुकानातून हातोडी आणली व शेजवाळ डोक्यात हातोडी मारली. या घटनेत शेजवळ हा गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, व सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी आरोपी बाऊन्सरसर तिघांना अटक केली आहे.

शेजवाळविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे

खून झालेला अट्टल आरोपी शेजवाळवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते. चोऱ्या, हाणामारी, खून या सारखे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. या पूर्वी त्याला अटक देखील करण्यात आली आहे. हॉटेलमध्येही त्याने गुरुवारी राडा घालण्याचा प्रयत्न केला. यावरून जोरदार हाणामारी होऊन त्याचा बाऊन्सर कडून खून झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर