मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha Crime: घरच्यांचा प्रेमाला विरोध असल्याने वर्ध्यातील पारडीत प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

Wardha Crime: घरच्यांचा प्रेमाला विरोध असल्याने वर्ध्यातील पारडीत प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

Feb 04, 2024 10:12 AM IST

Suicide of couple in Wardha : वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रेमी युगलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

wardha Crime news
wardha Crime news

couple commit Suicide in Wardha Pardi : तुम्ही एक दुजे केलीए चित्रपट पहिला असाल. लग्नाला विरोध असल्याने एकत्र येऊ न शकल्याने शेवटी दोघेही प्रेमयुगल आपले जीवन संपवतात. अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील पारडी येथे उघडकीस आली आहे. घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने घरातून पळून जाऊन पारडी येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Maharashtra Weather update: राज्यात थंडी पावसाचा खेळ! तापमानात होणार मोठी घट; असे असेल हवामान

हर्षल वाघाडे (वय २३) असे मुलाचे नाव आहे. तर मुलगी ही अल्पवयीन आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही पारडी येथील रहिवासी आहेत. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, त्यांच्या प्रेमाला घरच्याचा विरोध होता. यामुळे दोघेही घरातून पळून गेले होते. घरचे त्यांच्या शोधत होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात देखील तक्रार देण्यात आली होती. नातेवाईक आणि पोलिस त्यांचा शोध घेत असतांना तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पारडी येथे जंगलातील एका विहिरीत तयांचे मृतदेह आढळले. दोघांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Devendra Fadanvis : छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस बोलले; म्हणाले…

हर्षल वाघाडे आणि मुलीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. यामुळे दोघांनी पळून जाण्याचे ठरवले. दोघेही पळून जात पारडी परिसरातील जंगलात पळून गेले. त्यांचा शोध कुटुंबीयांनी घेलता. मात्र, ते सापडले नाहीत. यामुळे २३ जानेवारीला तळेगाव श्यामजी पंत पोलीस ठाण्यात नातेवाइकांनी तक्रार दाखल केली. मात्र, शनिवारी दुपारी येथील एका शेतात असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला.

ट्रेंडिंग न्यूज

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घातस्थळी जात दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. नातेवाईकांची देखील रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर