मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ravindra Dhangekar : रात्रीचा राडा रवींद्र धंगेकरांना भोवला! धंगेकरांसह ३५ ते ४० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Ravindra Dhangekar : रात्रीचा राडा रवींद्र धंगेकरांना भोवला! धंगेकरांसह ३५ ते ४० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 15, 2024 07:39 AM IST

Ravindra Dhangekar News : सहकार नगर पोलिस ठाण्यात भाजप उमेदवारांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याच्या आरोपावरून मतदानाच्या आदल्या रात्री राडा घातल्याने तसेच जमावबंदीचा आदेश मोडल्याने पुण्यात महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यात महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (HT)

Ravindra Dhangekar News : पुणे लोकसभा मतदार संघाचे मतदान नुकतेच संपले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलिस ठाण्यात मोठे ठिय्या आंदोलन केले होते. पोलिसांनी त्यांना आत ठाण्यात बसून चर्चा करण्यासाठी बोलावले असतांना देखील त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाण्याच्या आवारात बसून आंदोलन केल्याने जमावबंदीचा आदेशाची पायमल्ली केल्याने त्यांच्यासह ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र धंगेकर यांनी भाजपावरती पैसे वाटप केल्याचा आरोप करत सकाहर नगर पोलिस ठाण्यात ठिया आंदोलन केलं होतं. हे आंदोलन करणं त्यांना आता गुन्हा दाखल झाल्याने भोवण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : मुंबई, ठाण्यात तापमान वाढणार! पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

पुणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी सहकार नगर पोलिस ठाण्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्ते पैसे पैसे वाटप करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. ऐवढेच नाही तर त्यांची नवे देखील त्यांनी पोलिसांना सांगितली. मात्र, पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नअसल्याने रवींद्र धंगेकर यांनी रविवारी रात्री सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसह जो पर्यंत पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, तो पर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा धंगेकर यांनी घेत आंदोलन केले होते.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये होणार सभा, तर मुंबईत रोड शो

पुण्यात प्रतीके मतदार संघात घराघरात पैसे वाटले जात आहेत. जनतेचा हडप केलेला पैसा या निवडणुकीत वापरून भाजपने धनशक्तीचा वापर केला आहे. पैसे वाटपासाठी आजी-माजी नगरसेवक ते भाजपचे वरिष्ठ नेते देखील यात गुंतले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे गप्प राहणार नाही असे म्हणत धंगेकर यांनी हे आंदोलन सुरच ठेवले होते.

Ghatkopar Hoarding case : घाटकोपरमध्ये १४ जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ होर्डिंगची थेट ‘लिम्का बुक’ मध्ये आहे नोंद!

मतदानाच्या दिवशी देखील आंदोलन

धंगेकरांचे आंदोलन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मतदानाच्या दिवशी भाजपकडूने देखील रविद्र धंगेकरांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. मतदानाच्या दिवशी बुथवर उमेदवाराचा फोटो किंवा पक्षाचं चिन्ह होतं, असे म्हणत आचार संहितेच भाग केला असा आरोप करत रासने यांनी आंदोलन केले होते.

दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

पुण्यात भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. पुण्यात एकूण ५३.५४ टक्के मतदान झाले असून ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

IPL_Entry_Point