मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhaskar Jadhav : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा

Bhaskar Jadhav : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 20, 2022 02:47 PM IST

भास्कर जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली असून पुण्यातील डेक्कन पोलीस ठाऱ्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर जाधव
भास्कर जाधव

पुणे : शिवसेना पक्षाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिमा मलीन करण्याच्या दृष्टीने नुकतेच वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या भाषणात केले होते. याप्रकरणी भास्कर जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली असून पुण्यातील डेक्कन पोलीस ठाऱ्यात त्यांच्या विरोधात योगेश अरुण शिंगटे (रा.निगडी, पुणे) यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती पोलीसांनी गुरुवारी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

याप्रकरणी भास्कर जाधव यांच्यावर पोलीसांनी भादंवि कलम १५३ अ, ५०५/१, ५०५/२, ५००, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १९ ऑक्टोबर रोजी घडलेला आहे. तक्रारदार योगेश शिंगाटे हे डेक्कन परिसरातील फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेत बसले असताना, त्यांचे फेसबुक अकाऊंट पाहत होते. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, सिंधुदुर्ग, कुडाळ याठिकाणी कुडाळ मतदार संघाचे शिवसेना पक्षाचे आमदार वैभव नाईक यांचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागा तर्फे सुरु असलेल्या चौकशीचा निषेध करण्यासाठी एक मोर्चा आयोजित केला होता. त्यात आमदार भास्कर जाधव यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने अर्वाच्छ भाषेत वक्तव्य करुन उपहासात्मक उल्लेख केला. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्या असून राजकीय पक्षातील कार्यकर्त्यात सामाजिक, भावनिक तेढ निर्माण करुन त्यांच्यात संघर्ष निर्माण होण्यास चिथवाणी देऊन केंद्रीय मंत्रीपद हे संविधानिक असताना या पदाचा अपमान करुन जनमानसात बदनामी करुन सार्वजनिक आगळीक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.कांबळे पुढील तपास करत आहे.

डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे म्हणाले, कुडाळचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारदार योगेश शिंगटे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग