Mumbra news : ठाण्यातील मुंब्रा येथे एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. येथील अमृत नगर येथे एक तीन वर्षांची मुलगी रस्त्यावरून जात असतांना शेजारी असलेल्या चिराग मेसन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक कुत्रा थेट या मुलीच्या अंगावर येऊन पडला. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कुत्रा पाचव्या मजल्यावरून पडून देखील बचवला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
या घटनेची हकीकत अशी की, एक तीन वर्षांची मुलगी ही तिच्या आई सोबत अमृतनगर येथून जात होती. यावेळी बाजूला असलेल्या चिराग मेसन इमारतीच्या ५ व्या मजल्यावरुन एक कुत्रा थेट खाली पडला. हा कुत्रा रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीच्या अंगावर पडला. या घटनेत मुगली व कुत्रा दोन्ही जखमी झाले. मुलीला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलीला तपासले असता, त्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेतील कुत्रा मुलीच्या अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाला. तो काहीवेळ रस्त्यावर पडून राहिला व थोड्याच वेळात उठून लंगडत चालू लागला. त्यांना देखील प्राणी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती ही घटना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिराग मेंशन या इमारतीत पाचव्या मजल्यावर राहणारे जैद सय्यद या व्यक्तीने कुत्रा पाळला होता. मंगळवारी दुपारी २ वाजता हा कुत्रा अचानक पाचव्या मजल्यावरुन थेट खाली कोसळला. यावेळी तीन वर्षांची मुलगी ही तिच्या आईसोबत जात होती याच वेळी वरून या मुलीच्या अंगावर हा कुत्रा पडला. यामुले मुगली ही जागेवरच बेशुद्ध झाली. मुलीच्या आईने तिला तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, तिच्या मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.