Pune girl rape in manjari : पुण्यात सध्या महिला आणि मुलींवर अत्याचार वाढले आहेत. मुलींवरील अत्याचारांच्या अनेक घटना उघडकीस येत आहे. अशीच एक घटना पुण्यातील मांजरी येथे घडली आहे. दोघा मित्रांनी आपल्या १५ वर्षीय मैत्रिणीला वाढदिवसाचा केक कापण्याच्या बहाण्याने तिला नदीपत्रात निर्जन स्थळी नेऊन बलात्कार केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पीडित मुलीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुराग साळवे (वय २१, रा.आनंदनगर केशवनगर मुंढवा), गणेश अनिल म्हेत्रे (वय २३, रा. शिंदे वस्ती मुंढवा) अशी आरोपींची नाव आहेत. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी घडली. अनुराग व गणेश यांनी पीडित मुलीला फिरायला नेतो असे सांगून तिला गाडीवर बसवले. तिला मांजरी येथील नदीपत्रात निर्जनस्थळी असलेल्या झाडीत नेत आळीपाळीने बलात्कार केला. यानंतर दोघांनी पीडित मुलीला या संदर्भात कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिला तेथेच सोडून देऊन फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पुण्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका अभिनेत्रीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना देखील पुण्यात उघडकीस आली होती. पुण्यात गेल्या काही दिवसांत मुली आणि महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे.
या पूर्वी देखील एका पतीने आपल्या पत्नीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडले होते. त्याने आपल्या पत्नीचा सौदा आपल्या मित्रांशी केला होता. २०२३ मध्ये तब्बल ४०० बलात्काराचे गुन्हे घडले. यामुळे पुणे महिला आणि मुलींसाठी असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, या वाढत्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.