पुणे: पुण्यात एकतर्फी प्रेमातून मुलींवरील अत्याचयाराच्या घटना वाढल्या आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत अशाच एका घटनेतून मुलीवर कोयत्याने वार करण्यात आला होता. ही घटना ताजी असतांना आता एकतर्फी प्रेमातून रिक्षाचालकाच्या छेडछाडीला कंटाळून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्मतहत्या केली आहे.
त्रिशला बंडु कवडे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी सोमनाथ ऊर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (वय २२, रा. लोहगाव) याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पो लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ राखपसरे आणि पीडित मुलगी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. पीडित १५ वर्षांची मृत मुलगी ही गेल्या आठ दिवसांपूर्वी शिकवणीला जाताना आरोपीने तिच्याजवळ येऊन रिक्षा थांबवली. तसेच ‘मी सोडून देतो’ म्हणत तिला जबरदस्तीणे रिक्षात बसण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर ११ सप्टेंबर रोजी मुलीच्या घरी जात त्याने पीडित मुलगी ही घरात सोफ्यावर बसली असता, तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीची आई घरात आली असतांना त्यांना धक्का देऊन आरोपी फरार झालाहोता. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, त्याचा त्रास वाढतच गेल्याने अखेर मुलीने टोकाचे पाऊल उचलत बुधवारी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक एस. लहाने करत आहेत.
पुण्यात मुलींवरील अत्याच्याराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फसणारी एक धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीला भीक मागण्यासाठी केवळ २ हजार रुपयांना विकले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दखल घेत मुलीचा शोध घेत तिची सुटका केली. तसेच विकत घेणाऱ्या पती पत्नीला अटक करण्यात आली आहे.