दोन लाख भाकऱ्या अन् ३५ हजार लिटर आमटी! जुन्नरच्या 'या' मंदिरात १३८ वर्षांपासून बनतोय अनोखा महाप्रसाद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  दोन लाख भाकऱ्या अन् ३५ हजार लिटर आमटी! जुन्नरच्या 'या' मंदिरात १३८ वर्षांपासून बनतोय अनोखा महाप्रसाद

दोन लाख भाकऱ्या अन् ३५ हजार लिटर आमटी! जुन्नरच्या 'या' मंदिरात १३८ वर्षांपासून बनतोय अनोखा महाप्रसाद

Jan 02, 2025 03:22 PM IST

Rangnath Swami Mandir Aane Yatra : जुन्नर तालुक्यातील आणे येथील रंगनाथ स्वामी मंदिरात गेल्या १३८ पासूनची परंपरा आजही जपली जात आहे. या मंदिरात तयार होणारा महप्रसंद पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

दोन लाख भाकऱ्या अन् ३० हजार लिटर आमटी! जुन्नरच्या 'या' मंदिरात १३८ वर्षांपासून बनतोय अनोखा महाप्रसाद
दोन लाख भाकऱ्या अन् ३० हजार लिटर आमटी! जुन्नरच्या 'या' मंदिरात १३८ वर्षांपासून बनतोय अनोखा महाप्रसाद

Rangnath Swami Mandir : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आणे येथील रंगनाथ स्वामी महाराजांची यात्रा सुरू असून ही यात्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तब्बल १३८ वर्षांपासूनची परंपरा आजही या यात्रेत जपण्यात आली आहे. येथील महाप्रसाद पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. यंदा देखील या महाप्रसादांत थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल २ लाख भाकऱ्या तयार करण्यात आल्या तर त्या सोबत तब्बल ७० कढयांमध्ये ३५ हजार लिटर आमटी तयार करण्यात आली होती. या महाप्रसादाचा लाभ ग्रामस्थांनी घेतला.

आणे येथील रंगनाथ महाराजांची यंत्रा राज्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेला १३८ वर्षांची परंपरा आहे. नववर्षाच्या प्रारंभी रंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त जुन्नर तालुक्यातील आणे येथील रंगास्वामींच्या मंदिरात पुण्यतिथीनिमित्त ही यात्रा भरते. या यात्रोत्सवात आमटी-भाकरीचा महाप्रसाद तयार केला जातो.

या वर्षी देखील या यात्रेत ७० जम्बो कढईत तब्बल ३५ हजार लिटर आमटी तयार करण्यात आली तर त्या सोबत खाण्यासाठी २ लाख भाकरी देखील ग्रामस्थांनी तयार केल्या. या साठी गावातील नागरिक दरवर्षी पुढाकार घेत असतात. या महाप्रसादासाठी लोकनिधीतून १० लाख रुपयांचा मसाला या आमटीसाठी पुरविण्यात आला.

या आमटीसाठी दान देणीसाठी आधीच बूकिंग झाले आहे. हे बूइंग २०३४ पर्यंत फुल्ल आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते, सरपंच प्रियांका दाते दिली आहे. या संपूर्ण यात्रेचे नियोजन ग्रामस्थ करत असून ही परंपरा अविरतपणे चालू ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटलं आहे. ही यात्रा म्हणजे उत्तम नियोजनाचे आदर्श उदाहरण असल्याचे मानले जाते.

आणे येथील यात्रेचा वाढता लौकिक आणि येथे येणाऱ्या भाविकांमुळे या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘क’  दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या यात्रेकरूंसाठी काही सोयी देखील करण्यात आल्या आहेत.  ३५ हजार लिटर आमटी शिजवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या कढया आहेत.  प्रत्येक कढईत पाचशे लिटर आमटी शिजवली जाते. पाण्याची मोटार लावूनच पाइपने पाणी कढईत सोडावे लागते. दोन दिवसांत ३२ कढया आमटी तयार केली जाते. हा महाप्रसाद  विश्वस्तांच्या निगराणीत तयार केला जातो.  एका पंगतीत तीन ते चार हजार भाविक या महाप्रसादाचा आस्वाद घेतात.  

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर