मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli Fraud: बँक कर्मचाऱ्यानं ग्राहकांना घातला ९० लाखांचा गंडा, सांगलीतील घटना

Sangli Fraud: बँक कर्मचाऱ्यानं ग्राहकांना घातला ९० लाखांचा गंडा, सांगलीतील घटना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 28, 2023 11:15 AM IST

Sangli News: सांगली जिल्ह्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेत कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने १० ग्राहकांना तब्बल ८० लाखांना गंडा घातला आहे.

Sangli Fraud
Sangli Fraud

Sangli Shocking: सांगली जिल्ह्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेतील एका कर्मचाऱ्याने ग्राहकांना सुमारे ९० लाखांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तोहिद अमीर रिकमसलत (वय, २७) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सांगली जिल्ह्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेत कार्यरत आहे. आरोपी तोहिद रिकमसलत याच्याकडे बँकेच्या ग्राहकांना भेटून सेव्हिंग व करंट खाते उघडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, आरोपीने ग्राहकांचा विश्वास संपादन करून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता ग्राहकांकडून काही रक्कम घेतली. तसेच ग्राहकांच्या खात्यावरूनदेखील त्याने काही रक्कमही काढून घेतली. त्याने एप्रिल २०१९- १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ग्राहकांची 90 लाख 61 हजार 128 रुपयांची फसवणूक केली आहे. ग्राहकांच्या तक्रारीनंतर आऱोपीची चौकशी केला असता तो दोषी आढळून आला. त्यानंतर बँक कर्मचारी साजिद बाबालाल पटेल यांनी आरोपीविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने रिसाज दादापीर कोतवाल (मिरज) अमिना नजीर शेख (गुरुवार पेठ, मिरज), अशोक जिनगोंडा पाटील (मानमोडी रोड, कळंबी), समीर वजीर जमादार (मिरज), वाजिदा शमशुद्दीन कोतवाल, आशिया शमशुद्दीन चाऊस (मिरज), रमेश जमराम सेवानी (मंगळवार पेठ, मिरज), हुसेन इमाम बेपारी (वखारभाग, मिरज), गणी युसूफ गोदड (टाकळी रोड, मिरज) आणि मेहबूब अल्ल्लाबक्ष मुलाणी (मिरज) यांची फसवणूक केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग