मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rohit Pawar : राज्यपालांवर कारवाईसाठी रोहित प्रवारांच्या आत्मक्लेश आंदोलनात भर उन्हात आजीबाईंचा दोन तास ठिय्या

Rohit Pawar : राज्यपालांवर कारवाईसाठी रोहित प्रवारांच्या आत्मक्लेश आंदोलनात भर उन्हात आजीबाईंचा दोन तास ठिय्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 04, 2022 12:12 AM IST

Rohit Pawar : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज राज्यपाल यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आज वढूबुद्रुक येथे आत्मक्लेश आंदोलन केले. या आंदोलनात ७३ वर्षीय एका आजीने देखील भर उन्हात ठिय्या देत कारवाईची मागणी केली.

कौशल्य यशवंत
कौशल्य यशवंत

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले. तसेच भाजपचे नेते देखील अधून मधून विवादपूर्ण विधान करत असल्याने राज्यपाल यांच्यावर कारवाई करण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन केले. वढूबुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा समाधी स्थळी ठिय्या आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनात एका ७३ वर्षीय आजीने देखील ठिय्या आंदोलन करत राज्यपाल यांच्यावर कारवाईची मागणी केली.

कौशल्य यशवंत असे या आजीचे नाव आहे. आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी वढु बुद्रुक या ठिकाणी महापुरुषांच्या सन्मानासाठी आत्मक्लेश आंदोलन केले. दरम्यान, त्यांच्या सोबत दोन तास आंदोलन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या, शिवाजी महाराजांनी रयतेसाठी किती कष्ट घेतले. त्यांच्या अंगावर मीठ-मिरची टाकली तरीदेखील ते तटस्थ होते. आपल्यासाठी त्यांनी एवढे केले, त्यांच्यासाठी पाच मिनिटे उन्हात बसणे आपल्याला शक्य होत नसेल तर आपण माणसे म्हणवून घ्यायच्या लायकीचे नाहीत. शिवाजी महारांजाबाबत जे चुकीचे बोलतात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या मागणीसाठी आज मी देखील हे आंदोलन केले. आता कारवाई झाली नाही तर अशी वक्तव्य वारंवार करतील, त्यात पुढच्या पीढीला असा वाईट संदेश जात आहे, असे त्या म्हणाल्या.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, सुनील टिंगरे, अशोक पवार, संदीप क्षीरसागर, यशवंत माने हे नेते उपस्थितीत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सतत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन केलं आहे. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी मौन धरून आत्मक्लेश करण्यात आला. यावेळी विविध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग